मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा सोडून मातोश्री मुक्कामी

Chief Minister Uddhav Thackeray left Varsha and went to Matoshri

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार मंत्री एकनाथ शिंदेंमुळे अडचणीत आले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसमोर येत आपली भूमिका मांडली. मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. पण तुम्ही समोर येऊन मला राजीनामा देण्यास सांगा. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे मला कोणताही मोह नाही. तुम्ही बोलला की आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहे तर मी आतापासून माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो. या समोर येऊन बसा मी राजीनामा देतो. मी राजीनाम्याचे पत्र तयार ठेवतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. यानंतर सर्व साहित्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे. ते त्यांच्या मातोश्री या निवसस्थानीच आता मुक्कामी गेले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून बाहेर आले शिवसैनिकांकडून त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांनी हात जोडत लोकांचे आभार मानले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी या गर्दीतून वाट काढत हळू हळू पुढे सरकार होती.

संपूर्ण परिवारही होता सोबत –

मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा संपूर्ण परिवार होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेही त्यांच्यासोबतच वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. नेहमी सुसाट निघणाऱ्या गाड्या शिवसैनिकांच्या गर्दीमुळे धीम्या गतीने मातोश्रीकडे पोहोचल्या.

शिवसैनिकांची गर्दी – 

वर्षा निवासस्थान ते मातोश्री बंगला या मार्गावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी तीन ठीकठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडीबाहेर येऊन शिवसैनिकांना अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक भगवे झेडे हात घेऊन घोषणाबाजी करत होते.