Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम राज्यावर होऊ न देण्याचा निश्चय - मुख्यमंत्री उद्धव...

तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम राज्यावर होऊ न देण्याचा निश्चय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात अजून कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही, अनावश्य रेमडेसिवीरचा वापर टाळा - मुख्यमंत्री

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. राज्यातील रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला जनतेशी संवाद साधून राज्याला संदेश दिला आहे. कोरोना नावाचा राक्षस घातक ठरत असल्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कामगार दिनाच्या शुभेच्छा सर्व नागरिकांना दिल्या आहेत. तसेच सर्व वीरांना विनम्र अभिवादन केले आहे. राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वर्षांमधील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. काही मोजक्याच कोरोना लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम राज्यावर होऊ न देण्याचा निश्चय केला असल्याचा निश्चय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. मागील वर्षाचा महाराष्ट्र दिनही कोरोनाच्या सावटात गेला. आपल्या मागे दुष्टचक्र लागले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. तसेच तिसरी लाट आल्यावर कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही. राज्यातील नागरिकांनी समजुतदारपाणा दाखवल्यामुळे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही.

- Advertisement -

राज्यात सुरु असलेल्या कोरोनाचा हाहाकार रोखण्यासाठी कठोर निर्बंध, लॉकडाऊनची घोषणा केली. घोषणा करताना मलाही जड गेले, परंतु तुम्ही कोरोना नियमांचे पालन केले, रुग्ण संख्या स्थिरावण्यात यश आले. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत जर संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची अवस्था काय झाली असती याचा विचारही करता आला नसता. नाईलाजाने आपली रोजी ही मंदावले पण रोटी थांबू देणार नाही असे सांगितले होते त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात सुधारणा 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्याची आरोग्य व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पुर्वी कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा राज्यात २ चाचणी परीक्षण केंद्र होते आताच्या घडीला ६०० पेक्षा अधिक केंद्र उभारण्यात आले आहेत. आपात्कालीन रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. एकूण साडेपाच हजार कोविड सेंटर राज्यात उभारण्यात आले आहेत. मागील जूनमध्ये ३ लाख बेड्स होते आता ४ लाख ३१ हजार ९०२ बेड उभारण्यात आले आहेत. तसेच कोविड सेंटर संख्या जुन २०२० मध्ये २६६५ तर आता ५ हजार ५९५ कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. ऑक्सिजन खाटा जुनमध्ये ४२,८१३ तर आता ८६ हजार १०८ आहेत. आयसीयू बेड जुनमध्ये ११ हजार ८८२ आहेत होते तर आता २८ हजार ९३७ करण्यात आलेत व्हेंटिलेटर्स जुनमध्ये ३,७४४ होते ते आता ११,७१३ आहेत. जून २०२० पासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा

- Advertisement -

राज्यात दिवसाला १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता आहे. परंतु आपल्याला आता दिवसाला १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यासाठीची मागणी केली होती. केंद्र सरकारकडून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन कोठा केंद्राकडून ठरवण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यातून ऑक्सिजन पैसे खर्च करुन आणतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही परिस्थिती नाही म्हटले तरी थोडी थोडी सुधारली आहे.

ऑक्सिजन मिळाला नाही तर ५०० मेट्रिक टन लागतोय तो कोटा ठरवण्यात आला आहे. ऑक्सिजन टॅंकर, रेल्वे सर्व पैसे देऊन ऑक्सिजन आणतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही परिस्थिती नाही म्हटले तरी थोडी थोडी सुधारली आहे.

गरज नसेल तर रेमडेसिवीर वापरु नका

रेमडेसीवीरची मागणी वाढली आहे. केंद्राने रेमडेसीवीरीचे वाटप हाती घेतले आहे. राज्याकडून दरदिवसाला ५० हजार इंजेक्शनची मागण केली होती. परंतु केद्राने दरदिवशी २६८०० रेमडेसिवीरचा कोठा पुरवतण्यात येत होते. आपली ५० हजार इंजेक्शनची मागण होती. पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केल्यानंतर ४३ हजार रेमडेसीवीर मिळत आहेत. हे रेमडेसिवीरचा साठा देखील राज्य सरकार विकत घेत आहोत.

जागतकिक आरोग्य टास्क फोर्स केंद्राने सांगितले आहे गरज नसेल तर रेमडेसिवीर वापरु नका, रेमडेसिवीर द्यायचे की नाही याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या, जास्त दिल्यास त्याचा परिणाम होईल अनावश्यक रेमडेसीवीरचा वापर करु नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. येत्या महिनाभरात राज्यात अनेक राज्यांत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आलेले असतील. जवळजवळ पावणे तीनशे पीएसए प्लांट लावतो आहे. केंद्राकडून १० प्लांट देण्यात आले आहेत हे काही दिवसात लावण्यात येतील.

लॉकडाउन काळात दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजची अंमलबजावणी सुरू

५ हजार ४७६ कोटी रुपये

योजना

लाभ

प्रत्यक्ष अंमलबजावणी

अन्न सुरक्षा योजना

प्रती व्यक्ती ३ किलो गहू , २ किलो तांदूळ मोफत

७ कोटी लोकांना

गहू , तांदूळ वाटप सुरू

गहू ६२४० मेट्रिक टन

तांदूळ ४८१७ मेट्रिक टन

शिवभोजन थाळी

एक महिना मोफत

१५ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ. ८९० शिवभोजन केंद्रे

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन

दोन महिन्याकरिता प्रत्येकी १००० रुपये

३५ लाख लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे १४२८.५० कोटी रुपये अर्थसहाय्य दिले.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी

१५०० रुपये एक वेळचे अर्थसहाय्य

१३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार कामगारांच्या खात्यात पैसे जमा

घरेलू कामगार

विविध कल्याणकारी योजनातून सहाय्य १५०० रुपये

१ लाख ५ हजार कामगारांना १५ कोटी ८२ लाख ५० कोटी निधी वितरीत करण्याचे आदेश

फेरीवाले कामगार

प्रत्येकी १५०० रुपये एक वेळचे अर्थसहाय्य

६१.७५ कोटी रुपये निधी वितरीत

रिक्षाचालक

प्रत्येकी १५०० रुपये एक वेळचे अर्थसहाय्य

आदेश देण्यात आले आहेत. कार्यवाही सुरु होत आहे

आदिवासींना खावटी

प्रती कुटुंब २००० रुपये

सुमारे ११ लाख कुटुंबाना मदतीची कार्यवाही सुरु

जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करावयाचा निधी

सुविधा उभारणे, औषधी खरेदी

३३०० कोटी निधी डीपीडीसीत. त्यापैकी ११०० कोटी वितरीत

राज्यात कोरोनाधितांची संख्या वाढली आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची चेन रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन पुन्हा १५ मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच लॉकडाऊनमध्ये जाहीर करण्यात आलेले मदत पॅकेज आणि उपाययोजना तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

- Advertisement -