जिथे राज ठाकरेंची सभा तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा; परवानगीवरून वादाची शक्यता

जिथे राज ठाकरेंची सभा झाली तिथेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. 8 जून रोजी ही सभा होणार असून सभेकरीता या मैदानाची परवानगी मिळाली आहे.

cm uddhav thackeray make statewide tour after mumbai bkc meeting
मुख्यमंत्री मुंबईच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार, अनेक जिल्ह्यात घेणार सभा

जिथे राज ठाकरेंची सभा झाली तिथेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. 8 जून रोजी ही सभा होणार असून सभेकरीता या मैदानाची परवानगी मिळाली आहे. मात्र अद्याप औरंगाबाद पोलिसांची परवानगी मिळणं बाकी आहे. परंतु, ही परवानगीही पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याची माहिती औरंगाबादचे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या सभेसाठी मैदानाची परवानगी मिळाल्याने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आणि आसपासच्या परिसरात भगवमय वातावरण निर्माण करण्याची तयारी सध्या शिवसैनिकांकडून केली जात आहे.

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा ८ जून १९८५ रोजी औरंगाबादेत स्थापन झाली. या शाखेचा ३७ वा वर्धापन दिन येत्या ८ जून रोजी आहे. त्या निमित्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत यावे व जाहीर सभा घ्यावी अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भाष्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रत्यत्तर दिलं जात आहे. अशातच उद्धव ठाकरे हे या मैदानातील सभेत राज ठाकरेंना काय प्रत्यत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, औरंगाबादमधील मनसेच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी व शर्थी घालून दिल्या होत्या. सभेतील नागरिकांच्या उपस्थितीपासून ते अगधी भाषणाताली वक्तव्यावरही पोलिसांनी अट घातली होती. याशिवाय, त्यांच्या सभेलाही ऐनवेळी परवानगी देण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरेंची सभा ८ जून रोजी होणार असून त्यांच्या सभेला महिनाभर आधीच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – कोरेगाव -भीमा प्रकरण, संभाजी भिडेंना जयंत पाटलांमुळे क्लीनचिट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप