घरताज्या घडामोडीविरोधकांच्या राड्यामुळे राज्याचा दर्जा खालावला, मुख्यमंत्री ठाकरेंची सभागृह कामकाजावर प्रतिक्रिया

विरोधकांच्या राड्यामुळे राज्याचा दर्जा खालावला, मुख्यमंत्री ठाकरेंची सभागृह कामकाजावर प्रतिक्रिया

Subscribe

विरोधकांचे कृत्य मान शरमेनं खाली घालणारे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसांतील कामकाजावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी केलेल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांच्या अधिवेशनात अतिशय चांगल्या प्रकारे बातम्या आणि सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहचवल्यामुळे माध्यमांना धन्यवाद दिले. अजित पवार यांनी सांगितले की, विधीमंडळामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असे थोरात इकडे बसले आहे ते आवाक झाले आहेत ते ३० ते ३७ वर्षांच्या कारकिर्दीत बाळासाहेब थोरात यांना जो अनुभव आला आहे तो मला पहिल्याच वेळेत आला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हणून अनुभवाच्या बाबतीत मी त्यांच्यावरुन वरिष्ठ आहे. काल जे घडलं कोणीही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजीरवाण होते ही आपली संस्कृती, परंपरा नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांचे कृत्य मान शरमेनं खाली घालणारे

उत्कृष्ट संसद पटू यांना पुरस्कार देण्याचे कार्यक्रम आहे. हे परिमाण ठरल्यानंतर हल्ली जे चालले आहे ते बघितल्यानंतर कामकाजाचा दर्जा उंचवण्याचे काम आहे की, खालावण्याचे काम आहे. दर्जा खालावत चालला आहे. लोकप्रतिनिधींकडे जनतेची आपेक्षा असते की सामान्यांच्या आयुष्यात चांगला फरक घडला पाहिजे आणि जिथे घडवला जातो तिथे पाठवण्यात आले आहे. परंतु तिथेच जे कृत्य झाले ते मान शरमेनं खाली घालणारे होते. १२ आमदारांना निलंबित केल्यामुळे राज्यपालांच्या १२ आमदारांसह जोडण्यात येत आहे. परंतु असा कोणताही प्रकार नाही आहे जो काही राडा घडला ते सर्वांनी पाहिला आहे. सत्ताधाऱ्यांनी तो घडवला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आरडाओरडा करणं ही लोकशाही नाही

साधा विषय होता की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा ठराव केला, अधिकाराने वागू शकता परंतु वेडवाकडं आणि आरडाओरडा करायचा असेल तर ही लोकशाही नाही आहे. रस्त्यावर तुम्हाला करण्याचा अधिकार आहे. समोर माईक ओढायचे आणि माईक असताना बेंबीच्या देठापासून ओढायचे ही काही लोकशाही नाही आहे. भास्कर जाधव यांनी सांगितले आहे ते अर्धेच वर्तण आहे अजून जर ऐकले तर सहन होणार नाही. ही परंपरा राज्यात पडता कामा नये यासाठी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे मर्यादा काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दोन दिवसांमध्ये जनतेला आनंदी ठेवणं हा वेगळा भाग असला तरी समाधान देऊ अस काम केला आहे. त्यासाठी सर्व विधीमंडळ, विधानसभा, विधानपरिषद, तसेच उपस्थित सदस्य होते त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांच्याकडून जे घडू नये ते सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -

बोगस लसीकरणात जे कोणी आरोपी आहे त्यांच्यावर करावाई करण्यात येणार आहे. ज्यांनी बोगस लसीकरण करण्यात आले आहे त्यांची आरोग्य तपासणी करुन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

लगेच निवडणकू घेऊ

राज्यातील कोरोना परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यासाठी विनंती केली होती. परंतु आमदारांची आरटीपीआर चाचणी फक्त ७२ तासांसाठी ग्राह्य धरली जाते. अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो यामुळे एक दिवसात हि निवडणूक घेणं शक्य नाही. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -