Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांची राजकीय घोषणाबाजी, म्हणाले धाडसी निर्णय घेणारं...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांची राजकीय घोषणाबाजी, म्हणाले धाडसी निर्णय घेणारं…

Subscribe

CM Eknath Shinde in Dombivali Shobhayatra | गुढीपाडव्याच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावत जनतेसोबत आनंद लुटला आहे. मात्र, असे करतानाही राजकीय घोषणाबाजी करायला ते विसरले नाहीत.

CM Eknath Shinde in Dombivali Shobhayatra | डोंबिवली – गुढीपाडव्यानिमित्त राज्यभर विविध ठिकाणी शोभायात्रा निघाल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यावरील कोरोना प्रतिबंध नियमांतर्गत लावलेले सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले. सर्व सण-वार निर्बंधमुक्त केले. त्यामुळे कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निर्बंधाविना यंदा गुढीपाडवा साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावत जनतेसोबत आनंद लुटला आहे. मात्र, असे करतानाही राजकीय घोषणाबाजी करायला ते विसरले नाहीत.

“सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि आता पाडवादेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्याच्या विकासासह सांस्कृतिक भूक भागवली पाहिजे. संस्कृती, परंपरा जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे. याकरता सण-उत्सव साजरे केले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांच्या सरकारने सर्व निर्बंध काढून टाकले. त्यामुळे निर्बंधमुक्त सणांचा आनंद घेत आहोत. सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्यांचं सरकार आहे. गेल्या सात आठ महिन्यात जे निर्णय घेतले ते पाहिले तर एवढे धाडसी निर्णय घेणारं हे देशातील पहिलं राज्य ठरेल,” असं एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या शोभायात्रेच्या कार्यक्रमात म्हटलं. यावेळी व्यासपीठावर आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील आणि दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री सारा शिंदे, अभिनेता अंकुश चौधरीही उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – गिरगाव, डोंबिवलीत तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेषात शोभायात्रा गजबजल्या

“आपलं बजेट झालं. अर्थसंकल्प सादर झाला. देवेंद्र फडणवीसांनी तो मांडला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण, महिला भगिनी यांच्यासाठी सर्वसमावेशक बजेट केलं. सर्वांना न्याय देणारं बजेट केलं. महिला भगिनींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली. एसटीत ५० टक्के सवलत देऊन टाकली. ज्येष्ठांना मोफत प्रवास केला. हे सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे,” असा पुनरुच्चार शिंदेंनी यावेळी केलं.

- Advertisement -

“आज काय राजकीय व्यासपीठ नाही. ही स्वागतयात्रा आहे. हा उत्साह, जल्लोष पाहिला. हे आवश्यक आहे. म्हणूनच हे सरकार तुमच्या हिताचं निर्णय घेणार. आमचा काही पर्सनल अजेंडा नाही. राज्याचा विकास होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही साथ मिळते आहे. त्यामुळे हे डबल इंजिन सरकार काम करतंय. सुखाचे दिवस येण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -