घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील घोषणाबाजी : असले प्रकार सहन न करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

पुण्यातील घोषणाबाजी : असले प्रकार सहन न करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

Subscribe

मुंबई – एनआयए आणि ईडीने देशभारात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित कार्यकर्ते आणि संपत्तीवर छापे टाकले. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीविरोधात केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात आंदोलन झाली. यावेळी पुण्यात समाजकंटकांनी कथीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे.

मुख्यमंत्र्यांचे नेमके ट्वीट काय ? –

- Advertisement -

ट्वीटमध्ये पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असे म्हटले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले –

पुण्यात PFI वरील कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे आक्रमक आंदोलनकर्त्यांकजून यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -