राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे ‘कोरोना’मुळे निधन

पिंपरी - चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

chikhali former leader of opposition and ncp corporator datta sane passed away due to corona infection
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे 'कोरोना'मुळे निधन

पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी आज, सकाळी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने यांच्या पश्चात आई, पत्नी हर्षदा, मुलगा यश, मुलगी आणि दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.

दत्ता साने यांच्याविषयी…

दत्ता साने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. ते चिखली परिसरातून तीनवेळा निवडून देखील आले होते. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. या काळात त्यांनी अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. तसेच ते चिखली परिसरात ‘दत्ताकाका’ या नावाने संपूर्ण शहरात परिचित आहे.


हेही वाचा – coronavirus live update : राज्यात २४ तासांत आढळले ६,३६४ नवे बाधित रुग्ण!