घरताज्या घडामोडीबापरे! लॉकडाऊनच्या काळात अमरावतीत पार पडला बालविवाह सोहळा

बापरे! लॉकडाऊनच्या काळात अमरावतीत पार पडला बालविवाह सोहळा

Subscribe

अमरावतीत बालविवाह सोहळा पार पडला असून याप्रकरणी अनेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अमरावतीमध्ये चक्क बालविवाह सोहळा पार पडल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा अर्मळ येथे एका अल्पवयीन मुलीचा संपन्न झाल्याचे समोर आले आहे. वर आणि वधू दोघेही स्टेजवर असतानाच पोलीस आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थली दाखल होत त्यांनी धडक कारवाई केली. याप्रकरणी वरासह त्याचे आणि वधूचे नातेवाईक, तसेच लग्नात उपस्थित असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपलखुटा अर्मळ गावात हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पिंपळखुटा अर्मळ येथील १७ वर्षीय मुलीचे लग्न वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील भडशिवणी गावातील २५ वर्षीय तरुणासोबत ठरवण्यात आले. त्याप्रमाणे त्यांचा आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, याबाबत चाइल्ड लाइनच्या सदस्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यावेळी मुलीला तुझे वय किती अशी विचारणा केली. त्यावर आपले वय १७ वर्ष ३ महिने असल्याचे मुलींने सांगितले. त्यामुळे बाल संरक्षण अधिकारी यांच्या तक्रारीवरुन फ्रेजरपुरा पोलिसांनी वर, त्याचे आईवडील, वधूचे पालक, नातेवाईक आणि ३० ते ४० वऱ्हाड्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – सगळं सुरु आहे मग आदेश कुठला आहे? पुण्याच्या व्यापारी वर्गाचा सवाल

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -