घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रChild Pornography : जळगाव-धुळ्यात सीबीआयचे छापे, शेतकऱ्याच्या घरातून मोबाईल जप्त

Child Pornography : जळगाव-धुळ्यात सीबीआयचे छापे, शेतकऱ्याच्या घरातून मोबाईल जप्त

Subscribe

शेतकऱ्याच्या घरी छापा टाकून चौकशी, देशभरातील १४ राज्यांमध्ये कारवाई

संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडणाऱ्या पोर्नोग्राफीपाठोपाठ आता चाईल्ड पॉर्नोग्राफीचं प्रकरण पुढे आलंय. याप्रकरणी सीबीआयने जळगाव-धुळ्यासह देशभरातील १४ राज्यांमध्ये कारवाई केली आहे. सेक्स स्कँडलमुळे बदनाम झालेल्या जळगावचे नाव या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.

सीबीआयच्या पथकाने जळगावातील चोपडा तालुक्यात असलेल्या एका शेतकऱ्याच्या घराची झडती घेत चौकशी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ होते. ज्या ठिकाणी सीबीआयने छापा टाकला त्या शेतकऱ्याच्या घरातून मोबाईल जप्त करण्यात आला. या शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांच्या मोबाईलवरुन काही लिंक शेअर केल्या असण्याचा संशय आहे. तसेच, अधिक चौकशीसाठी शेतकऱ्यासह त्याच्या मुलाला नागपूरात बोलावले असल्याचे सांगितले जाते आहे. २०१७ सालात या शेतकऱ्याचा मुलगा अल्पवयीन असताना त्याने अजाणतेपणी काही लिंक्स शेअर केल्या होत्या. दरम्यान, चाईल्ड पॉर्नोग्राफीप्रकरणी सीबीआयने गेल्या दोन दिवसांत १४ राज्यांमधील ७६ ठिकाणी छापे टाकल्याचे सांगितले जाते आहे. त्यात महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळ्याचा समावेश आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -