घरमहाराष्ट्रवाढदिवस साजरा न करता चिमुकल्यांची शहीदांच्या कुटुंबीयांना मदत

वाढदिवस साजरा न करता चिमुकल्यांची शहीदांच्या कुटुंबीयांना मदत

Subscribe

आपला वाढदिवस साजरी न करता अमरावतीच्या चिमुकल्यांनी शहीद कुटुंबियांना ५१ हजार रुपयांची मदत केली आहे.

धामणगाव रेल्वे शहरातील दोन चिमुकल्यांनी वाढदिवस साजरा न करता वर्षभर जमा केलेली खाऊची आणि वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाची ५१ हजार रुपयांची रक्कम पुलवामा घटनेत शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली आहे. धामणगाव शहरातील लुनावत नगर येथील रहिवासी तथा स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये पहिलीत शिक्षण घेणारी मधुरा राऊत हिचा आज तर सेफला हायस्कुल येथे आठवीत शिकत असलेला तिचा मोठा भाऊ शार्दुल राऊत यांचा याच महिन्यात वाढदिवस आहे. या दोन्ही बहिणभावाने आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर जमा केलेली खाऊची रक्कम आणि वाढदिवसाला खर्च येणारी रक्कम तहसीलदार भगवान कांबळे यांना सुपूर्द केली आहे. शार्दुल याला पाचवीपासून देशाच्या सीमेवर असलेल्या सैनिकांना स्फुर्तीदायक पत्र लिहण्याचा छंद आहे. दिवाळी, स्वातंत्र्य दिनाला हे पत्र तो पाठवितो तर मधुराला चित्र काढण्याची आवड आहे. आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे संघटक मोहन राऊत यांचे हे दोन्ही मुल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -