करोनाचा कहर संपला, चीन सरकारचा खुलासा

CHINA-WUHAN
चीनचे वुहान पूर्वपदावर

बिजिंग – चीनमध्ये मोठे थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे कहर संपल्याचे आज चीन सरकारच्या प्रवक्त्यांमार्फत जाहीर करण्यात आले आहे. करोनाच्या नवीन रूग्णांच्या केसेस येण्याचे प्रमाण कमी झाले. आता नवीन केसेस येत नसल्याचे संपुर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे. चीनचे सरकारचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी बिजिंग येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. करोनेचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान येथे करोनाच्या रूग्णांची प्रकरणे ही आता एकेरी संख्येवर आलेली आहेत. करोनाच्या प्रकरणांची संख्या आता आठ पर्यंत खाली आली आहे. चीनच्या वुहान येथे आता सर्व गोष्टी पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. त्याठिकाणचे जनजीवन सामान्य होण्यासाठी आता सुरूवात झाली आहे.

अनेक आठवडे वुहान ठप्प झाल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण पूर्वीसारखी चीनच्या शहरांमधील गर्दी अजुनही पहायला मिळत नाही ही सध्याची स्थिती आहे. लोकांनी पुन्हा एकदा आपल्या फॅक्टरीमध्ये तसेच ऑफिसमध्ये जायला सुरूवात केली आहे. वुहानमध्ये चीनच्या राष्ट्रपतींनी येऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावाही घेतला आहे. स्थलांतरीत कामगारांसाठी मात्र अजुनही देशांतर्गत प्रवासासाठी अजुनही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.