घरमहाराष्ट्रचीनने पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री

चीनने पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री

Subscribe

येत्या १ जानेवारीपासून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधणार असून, त्याद्वारे जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

भारत व चीनचे सांस्कृतिक व पर्यटनाचे घनिष्ठ नाते असून ते अधिक वृध्दिंगत करण्यात चायनीज कंपन्यांनी येथे पायाभूत सुविधा व पर्यटन विकासासाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पर्यटन, सांस्कृतिक भागीदारी, उद्योग आदी विषयांसबंधी सह्याद्री अथितीगृह येथे चीनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव सतीश जोंधळे पाटील उपस्थित होते.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या शिष्टमंडळाने विविध विषयांवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. चीन येथे होत असलेल्या जागतिक प्रदर्शनामध्ये देशातील अधिक कंपन्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत व चीन या दोन्ही देशांना संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे.

पर्यटन हे क्षेत्र दोन्ही देशांना जोडणारा दुवा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगक्षेत्रालाही चालना मिळेल. त्यामुळे पर्यटन विकासात पायाभूत सुविधांमध्ये चायनीज कंपन्यांनी गुंतवणूक करावी. चीनी पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाहीदेखील श्री. फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.

- Advertisement -

नवीन वर्षात मुख्यमंत्र्यांचा ‘लोक संवाद’

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधत जाणून घेणार आहेत. १ जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -