घरCORONA UPDATEचीनच्या वुहानमधील लॉकडाऊन संपुष्टात

चीनच्या वुहानमधील लॉकडाऊन संपुष्टात

Subscribe

जगभरातील औद्योगिक उत्पादनावर करोना व्हायरसचा परिणाम झाल्यामुळे अनेक उद्योग ठप्प झाल्याचे जगभरात चित्र आहे. पण आता चीनमध्ये मात्र औद्योगिक उत्पादन पूर्वपदावर येऊ लागले आहे. उद्योगांमध्ये कामकाज सुरू होण्यासोबतच आता चीनमध्ये विमानतळावरील उड्डाणांमध्ये हळूहळू वाढ व्हायला लागली आहे.

जगभरातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये आता उत्पादन सुरू झाल्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या इतर अर्थव्यवस्थांसाठी मात्र ही समाधानाची गोष्ट आहे. आता करोना व्हायरसचा मोठा फटका हा युरोप, अमेरिका, भारत आणि लॅटिन अमेरिकेला बसू लागला आहे. चीनमध्ये मात्र आता कामगार कामावर परतण्यास सुरूवात झाली आहे. चीनमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर चीनमधील करोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरातल लॉक डाऊनही लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या ८ एप्रिलला हे लॉकडाऊन संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत.  चीनमध्ये आता ऑटोमोबाईल व्यवसायदेखील पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर असून आता ऑटोमोबाईल क्षेत्रातही लोक गुंतवणुक करू लागले आहेत.

- Advertisement -

रिअल टाईम इंडिकेटर्सनुसार चीनमध्ये आता पुन्हा एकदा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सची सुरूवात होत आहे. आता इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सचा पहिला टप्पा आहे. पण चीनमध्ये अनेक गोष्टी आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. चीनमध्ये आता रस्ते वाहतुकीतही वाढ होत असून गेल्याच आठवड्यात चीनमध्ये २१ टक्के वाहतूक पूर्वपदावर आली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्येही वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. चीनमध्ये जानेवारीच्या सुरूवातीलाच लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. चीनमधील नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच लॉक डाऊन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -