घरमहाराष्ट्रचिपी विमानतळावरून जाता येणार हैदराबाद आणि म्हैसूरला; १ फेब्रवारीपासून सेवेत

चिपी विमानतळावरून जाता येणार हैदराबाद आणि म्हैसूरला; १ फेब्रवारीपासून सेवेत

Subscribe

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी विमानसेवा देणाऱ्या अलाना एअर या कंपनीतर्फे हैद्राबाद सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. सुरवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी जशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. नंतर प्रवासी संख्या बघून या सेवेचा हळूहळू विस्तार केला जाईल, अशी माहिती सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाने दिली.

सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरून  १ फेब्रुवारी २०२३ पासून हैदराबाद व म्हैसूरला जाता येणार आहे. या सेवेसाठी विमाने सज्ज झाली आहेत. त्यामुळे चिपी विमानतळावरून कोकणातून थेट परराज्यात जाता येणार आहे.

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी विमानसेवा देणाऱ्या अलाना एअर या कंपनीतर्फे हैदराबाद सिंधुदुर्ग- म्हैसूर-हैदराबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. सुरवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी जशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. नंतर प्रवासी संख्या बघून या सेवेचा हळूहळू विस्तार केला जाईल, अशी माहिती सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाने दिली.

- Advertisement -

या सेवेच्या प्रारंभाने सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैदराबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार आहे. विमान कंपनी मार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एक विमान दर बुधवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६.०० वा म्हेसूर मार्गे हैदराबाद करीता उड्डाण करेल, तर दर रविवारी हैदराबादवरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६.३० वा म्हैसुर मार्गे हैदराबाद करीता उड्डाण करणार आहे. कोकणातील जास्तीत जास्त प्रवाशांनी या विमानवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे लोकार्पण झाले. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले होते. चिपी विमानतळावर विमान सेवा बरोबरच हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार असल्याचे लोकापर्ण करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

चिपी विमानतळावरून जाता येणार हैदराबाद आणि म्हैसूरला; १ फेब्रवारीपासून सेवेत
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -