चिपी एअरपोर्टचे अखेर लोकार्पण, चिपी – सिंधीयांचा असाही योगायोग

chipi airport inauguration

चिपी विमानतळाच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपिठावर आलेले पहायला दिसले. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनीही विमानतळासाठी दीपप्रज्वलन करत औपचारिकपणे उद्घाटन केले. खासदार विनायक राऊत यांच्या निमंत्रणावर त्यांनी लवकरच चिपी विमानतळाला भेट देण्याचे आश्वासन दिले. चिपी विमानतळाच्या निमित्ताने ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याशी संबंधित खासदार विनायक राऊत यांनीह एक योगायोग बोलून दाखवला.

कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

असाही योगायोग 

१९९२ साली केंद्रीय वाहतूक मंत्री माधवराव सिंधीया असताना त्यांनी पाहणी केले होते. तसेच खासदार ब्रिगेडियर सावंत हेदेखील त्यांच्यासोबत होते. योगायोगाने ज्योतिरादित्य सिंधीया हे हवाई वाहतूक मंत्री झालेत आणि विमानतळाचे उद्घाटन करत आहेत, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. दुसरा योगायोग म्हणजे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी या विमानतळाचे भूमीपूजन केले होते आणि आज उद्घाटनही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. या एअऱपोर्टच्या निमित्ताने चिपी विमानतळाच्या प्रवासासाठीचा पहिला बोर्डिंग पास हा ज्योतिरादित्य सिंधीया आणि सुभाष देसाई यांना प्रतिकात्मक रूपात देण्यात आला.