घरमहाराष्ट्रचिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

Subscribe

कोकणवासीयांचा विमान प्रवास लांबला

चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे कोकणवासियांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. सिधुदुर्गाच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन २३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नवनिर्मित चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दिनाचे औचित्य साधले होते. परंतु काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा लांबणीवर गेला आहे. याबाबतची माहीती मंत्री उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी दिली आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी कुठुनही मान्यता दिली नाही. चिपी विमानतळाचे उद्घाटनसंबंधी माध्यमांद्वारे सादर झालेला कागद सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा विभागाने दिला नाही. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातूनही या कागदावर अधिकृत माहीती दिली नसल्याचे पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढे म्हटले आहे की, सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी आणि विमानतळ सुरु करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने हे विमानतळ सुरु करण्यासाठी कोणतीही आडकाठी केली नाही. परंतु २३ जानेवारीला विमानतळ सुरु करण्याबाबत कोणतीही परवानगी पालकमंत्री म्हणून मी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली नाही.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांनंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहणार होते. पंरतु उद्घाटन लांबणीवर गेले आहे. हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याने राज्यातील जनतेचे लक्ष या विमानतळाच्या उद्घाटनाकडे लागले होते. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -