विमानतळ उद्घाटनाला पायगुण लागतो, मुख्यमंत्री ठाकरेंचा उल्लेख करत देसाईंनी लगावला टोला

मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणेंनी एकमेकांकडे पाहिलंही नाही

Chipi airport Inauguration subhash desai slams narayan rane called uddhav thackeray favourite cm
विमानतळ उद्घाटनाला पायगुण लागतो, मुख्यमंत्री ठाकरेंचा उल्लेख करत देसाईंनी लगावला टोला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे. या बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन अखेर करण्यात आलं आहे. विमानतळ सुरु करण्यासाठी उशीर करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रियांवर शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चांगलाच विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. विमानतळाच्या उद्घाटनाला पायगुण लागतो आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येत आहे असा टोला सुभाष देसाईंनी लगावला आहे. महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख सुभाष देसाईंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव घेणं टाळलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे तब्बल १६ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाचा एकाच व्यासपीठावर बाजू-बाजूला बसले आहेत. परंतु दोन्ही नेत्यांनी एकदाही एकमेकांकडे पाहिले नाही. यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लाडके आणि देशाचे एक नंबर मुख्यमंत्री असे म्हटलं आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की, अनेक जणांनी विमानतळाच्या उद्घाटनाला विलंब झाले असल्याचे बोलून दाखवलं परंतु त्याला पायगुण लागतो, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होत आहे. असो टोला सुभाष देसाई यांनी लगावला आहे. खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी या विमानतळाच्या उद्घाटनासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे १२ महिने विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

ठाकरे -राणेंमध्ये टशन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोरच केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणेंनी एकमेकांकडे पाहिलंही नाही आहे. मंचावर देखील मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे यांची खुर्ची बाजूला आहे. परंतु एकदाही या नेत्यांनी एकमेकांकडे पाहून नमस्कारही केला नाही.


हेही वाचा :  चिपी एअरपोर्टचे अखेर लोकार्पण, चिपी – सिंधीयांचा असाही योगायोग