सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला, कोणतरी बोलेलं मी बांधला, मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार

आजचा क्षण हा आदळा आपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणच्या मातीमध्ये बाभळीची झाडे

Chipi airport sindhudurg fort built shivaji maharaj uddhav thackeray slams narayan rane on infrastructure of sindhudurg
सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला, कोणतरी बोलेलं मी बांधला, मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचे अखेर उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले आहे. या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. नारायण राणेंनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केला असल्याचा दावा केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो आणि विकासकामे केली. आज कोकणात जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यामध्ये राणेंचे योगदान असल्याचे नारायण राणेंनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाकरे शैलीत आणि मिश्किल टिप्पणी करुन राणेंवर पलटवार केला आहे. सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्ला मी बांधला असा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कोकणातील इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याच्या उभारणीला नारायण राणेंचं योगदान असल्याचा दावा राणेंनी केली आहे. तसेच दुसरा कोणी इथे येऊच शकत नाही असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे की, मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की, तो किल्ली मी बांधला अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोकणच्या मातीमध्ये बाभळीची झाडे

आजचा क्षण हा आदळा आपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी मातीशी नाळ कायम ठेवल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंच कौतुक केलं आहे. मातीचा एक संस्कार असतो मातेचा संस्कार असतो. मातीच्या वेदना काही वेळी मातीत जाणे, अनेक झाडे उगवतात त्यात काही बाभळीची असतात काही अंब्यांची असतात. बाभळीची झाडे उगवली तर माती म्हणते मी काय करु जोपासावं लागतं असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

मनातीळ मळमळ बोलून दाखवणं वेगळं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे. काही लोकांना पाठांतर करुन बोलावं लागतो आणि अनुभवाने बोलणं वेगळं असते. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षा वेगळं असते असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी काढलं

पुढे मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंनी म्हटलंय की, बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नाही त्यामुळे त्यांनी खोटं बोलणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. हा सुद्धा इतिहास आहे. कटू असेल तरी चालेल पण सत्य बोल खोटं बोलणं मला परवडणारं नाही. गेट आऊट हे बाळासाहेबांनी दाखवलं आहे. त्याच्यामुळे मला इतिहासात जायचं नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राणेंचा समाचार घेतला आहे.


हेही वाचा : कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी काळा तिठा लागतो, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका