घरताज्या घडामोडीक्वारंटाईन सेंटर, रुग्णालयांतील महिला अत्याचाराबाबत SOP मध्ये चित्रा वाघ यांनी काढल्या ६...

क्वारंटाईन सेंटर, रुग्णालयांतील महिला अत्याचाराबाबत SOP मध्ये चित्रा वाघ यांनी काढल्या ६ त्रृटी

Subscribe

तक्रार निवारण समितीकडे तक्रार पडून राहिली तर समितीचा उपयोग काय?

महाराष्ट्रात कोरोना काळात कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना रुग्णालयात महिलांवर अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळाच्या घटना समोर आल्या होत्य. या घटना घडल्यानंतर सर्वच स्तरातून एक एसओपी जारी करण्याची मागणी केली जात होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या घटनांवर राज्य सरकारवर हल्लाबोल करत SOP जारी करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारकूडन एसओपी जारी करण्यात आली आहे. परंतु या SOPमध्ये अनेक त्रुटी चित्रा वाघ यांनी निदर्शनास आणल्या आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी SOP ची प्रत ट्विट करत ६ त्रृटी निदर्शनास आणल्या आहेत. तसेच राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. अखेर SOP आली.. ज्यासाठी राज्यात कोविड/क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल महिलांना तब्बल ४ बलात्कार व १६ विनयभंगासारख्या गलिच्छ घटनांना सामोरं जावं लागलं जेव्हा आम्ही सातत्याने मागणी करत होतो तेव्हा केवळ भाजपवाले मागणी करतात या अहंकारापायी सरकार SOP तयार करायला तयार नव्हते का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

कोविड/क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने बनवलेल्या SOP मधील गंभीर त्रुटी

- Advertisement -

१. संपूर्ण SoP ची अंमलबजावणी करून घेणारा स्थानिक प्रशासनातील अधिकारी निश्चित करण्यात आलेला नाही

२. तक्रार निवारण समितीमध्ये कोण असावे याविषयी संदिग्धता आहे

३. तक्रार निवारणाची पद्धत निश्चित केलेली नाही पीडित महिलेची तक्रार निकालात काढून आवश्यक ती पुढील कारवाई (उदा.पोलीस तक्रार)करण्यापर्यंतची कालमर्यादा आखून दिलेली नाही.

४. तक्रार निवारण समितीकडे तक्रार पडून राहिली तर समितीचा उपयोग काय?

५. संपूर्ण SOP मध्ये केवळ ‘लक्ष द्यावे’ ‘दक्षता बाळगावी’असे शब्द लिहिले आहेत पण निष्काळजीपणा झाला तर त्यासाठी जबाबदार कोण हे सांगितलेले नाही

६. काय केले पाहिजे असे सांगताना जर संबंधित गोष्ट केली नाही तर काय कारवाई होणार हे सरकारने सांगितले पाहिजे

७. थोडक्यात गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोणीच नसेल असाच या SOP तून निष्कर्ष निघतो SOP मध्ये वरील मुद्दयांचा विचार व्हावा अन्यथा त्याचा प्रभावी उपयोग होणार नाही

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -