घरमहाराष्ट्रऔरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय...; चित्रा वाघ जितेंद्र आव्हाडांवर संतापल्या

औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय…; चित्रा वाघ जितेंद्र आव्हाडांवर संतापल्या

Subscribe

Chitra Wagh | अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. त्यातच, चित्रा वाघ यांनीही जितेंद्र आव्हाडांना माफी मागण्याचे आवाहन केले आहे.

Chitra Wagh | मुंबई – राष्ट्रवादीचे दोन नेते सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, तर जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाचा उल्लेख करत तो हिंदूद्वेष्टा नसल्याचा दाखला दिला. यावरून राज्यात खळबळ माजली आहे. यावरून आता भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून काय म्हणाल्या…

- Advertisement -

हातून सत्ता निसटल्यावर बावचळलेले लोक आहेत हे… संभाजी महाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत. जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका? तात्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्यासारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही, असा धमकीवजा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे.


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

- Advertisement -

“संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही त्याने फोडलं असतं,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आज म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बाजू घेण्याकरता त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. अजित पवारांची पाठराखण करताना जितेंद्र आव्हाड यांचीच जीभ घसरली आणि चक्क औरंगजेबाचं कौतुक केलं. त्यामुळे अजित पवारांसह जितेंद्र आव्हाडही सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

हेही वाचा – औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, पवारांनंतर आव्हाडांची जीभ घसरली

अजित पवार काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक असे म्हणतो. काही जण त्यांना धर्मवीर म्हणतात. संभाजीराजे धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तरीही काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर-धर्मवीर म्हणतात, असे अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत म्हटले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -