आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात…

chitra wagh congratulate tweet on rupali chakankar for appointed state women commission
आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली होती. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रावणाच्या मदतीला शुर्पणखा नको असे ट्विट केले होते. यावरुन चित्रा वाघ यांच्यावर टीका झाली होती. परंतु आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत रुपाली चाकणकर यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्यामुळे अभिनंदन केलं आहे. चित्रा वाघ पुर्वी राष्ट्रवादीत होत्या त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती. याच मैत्रीला जागत आता चित्रा वाघ यांनी चाकणकरांचे अभिनंदन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याबद्दल पत्रक बुधवारी प्राप्त झालं आहे. गुरुवारी रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली होती. यामुळे चाकणकर यांची अधिकृत नावाची घोषणा केल्यामुळे चित्रा वाघ नेमक्या काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. राज्य सरकारला अखेर मुहूर्त सापडला असे म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचे मनापासून अभिनंदिन केलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, २ वर्षांपासून भाजपने दिलेल्या लढ्याला यश मिळालं आहे. राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. तसेच इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु होईल. अशा आशयाचे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

आधी शूर्पणखा असा उल्लेख..

राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये चर्चा होती. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रावणाच्या जोडीला शूर्पणखा नको असे ट्विट केले होते. चित्रा वाघ यांनी “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल. असे ट्विटमध्ये म्हटलं होते.


हेही वाचा : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती, गुरुवारी स्वीकारणार जबाबदारी