घरताज्या घडामोडीअध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, चित्रा वाघ यांचं चाकणकरांना प्रत्युत्तर

अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, चित्रा वाघ यांचं चाकणकरांना प्रत्युत्तर

Subscribe

राज्याच्या राजकारणात उर्फी जावेद हे प्रकरण सध्या तापू लागलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली. दरम्यान, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, एका मुलीचा मुंबईच्या रस्त्यांवरती आणि सार्वजनिक ठिकाणी ज्यापद्धतीने नंगानाच सुरू आहे. तो बंद व्हावा, यासाठी आम्ही आवाज उठवला. त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडेही गेलो. आमची भूमिका आम्ही त्यावेळी वेळोवेळी मांडली. काल बरेच प्रश्न आमच्या भूमिकेवर उपस्थित करण्यात आले, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला नाही असं का?, तेजस्वीनी आणि उर्फीच्या प्रकरणात अंगप्रदर्शनाचाच आक्षेप आहे. ज्या पद्धतीने या प्रकरणात जी अंमलबजावणी, कार्यपद्धती करण्यात आली. ती त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलो आहोत. एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.

आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात. महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का?, मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता. एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर अशी विधानं शोभत नाहीत, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणेच.., राऊतांचा मुख्यमंत्र्यांना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -