घरमहाराष्ट्रChitra Wagh : शेखचिल्ली स्वप्ने पाहू नका..., चित्रा वाघांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Chitra Wagh : शेखचिल्ली स्वप्ने पाहू नका…, चित्रा वाघांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी मुंबईत आले होते. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना भाजपा मुंबईसह देशात तडीपार होणार असल्याचे सांगितले. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून, शेखचिल्लीची स्वप्ने पाहू नका, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; तरुणांकडून दगडफेक करण्याचाही प्रयत्न

- Advertisement -

मोदी सभांमध्ये सांगतात आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. पण त्या सभेत त्यांच्या आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. दररोज त्यांच्या पक्षात सरासरी 5 भ्रष्टाचारी लोकांचा प्रवेश होतो. हे सर्व लोक अट्टल भ्रष्टाचारी असतात. पण नरेंद्र मोदी असा विनोद रोजच करत असतात. जॉनी लिव्हर यांच्यानंतर कोणी आमचे मनोरंजन करत असतील तर, ते गुजरातचे लिव्हर आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मोदी यांनी मुंबईत 10 काय 50 सभा घेतल्या तरी, यावेळी भाजपाला तडीपार करण्याचा निर्धार मुंबईकरांनी केला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

यावरून चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा टिळा माथ्यावर मिरवून मागच्या निवडणुकीत मते मागितली होती आणि जिंकून आला होतात, त्यांना या निवडणुकीत तडीपार करण्याची नुसती भाषा बोलताना तुमच्या तोंडाला आज फेस आला, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Thackeray Group : भाजपामध्ये नमो नव्हे तर मनोरुग्ण; उद्धव गटाचा हल्लाबोल

तुमची मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोतडी जनतेसमोर कधीचीच उघडी पडली आहेत. त्यामुळे जनता छडी घेऊन तुमच्यावर तुटून पडू नये, म्हणून आमच्या तडीपारीच्या गमजा मारत आहात. जनतेचे बळ पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. त्यामुळे भाजपाची बरोबरी करण्याचे शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लढाई बरोबरीच्या पैलवानांत होते. हिंदकेसरीला ललकारण्याचे स्वप्न गल्लीतील काडीपैलवानाने पाहू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तुम्हाला आम्ही एक तर अस्मान दाखवू नाही तर धुळीत मिळवू. त्यामुळे खयाली पुलाव शिजवून आपण काहीतरी चमत्कार घडवू, असली शेखचिल्ली स्वप्ने पाहू नका. असेही त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Prasad Lad : …तर संजय तुला सोडणार नाही; राऊतांचा एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -