घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, कॅलिबर महिलांना...

मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, कॅलिबर महिलांना…

Subscribe

Chitra Wagh | विधानसभेत भाजपा महिला सदस्यांचं संख्याबळ इतर पक्षाच्या महिला सदस्यांपेक्षा जास्तच आहेत. भाजपामधील महिला आमदारांमध्ये तसं कॅलिबर आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. 

Chitra Wagh | सोलापूर – राज्यात हिवाळी अधिवेशन संपल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मागच्या मंत्रिमंडळात ज्या आमदारांना स्थान मिळालं नाही त्यांना विस्तारात तरी स्थान मिळण्याची आस आहे. त्यामुळे लवकरात लवकर विस्तार व्हावा अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, सध्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता मंत्रिमंडळात १०० टक्के महिलांना संधी मिळणार, असा विश्वास भाजपा नेत्या आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. आज त्यांनी सोलापुरातून माध्यमांशी संवाद साधला.

महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून चित्रा वाघ महाराष्ट्र दौरा करत आहेत. महाराष्ट्र दौऱ्यात महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर त्या काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार का, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. त्यावर वाघ म्हणाल्या की, मंत्रिमंडळात महिलांना १०० टक्के स्थान मिळणार. मला विचाराल तर ३ ते ४ महिलांना मंत्रीपद दिलं पाहिजे. मंत्रिपदाचे कॅलिबर असलेल्या अनेक महिला विधानसभेच्या सदस्या आहेत. त्यामुळे महिलांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपालांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले…

निवडणुकीसाठी महिलांना ५० टक्के आरक्षण तर आहेच. पण बऱ्याच ठिकाणी खुल्या जागेतही महिलांना संधी आहे. मी महिला आहे म्हणून मला संधी द्या, असं न करता माझं माझं कर्तृत्व बघा आणि संधी असं महिलांना वाटलं पाहिजे. काम ऐसा करो की नाम हो जाए. निवडून येण्याचं कॅलिबर असलेल्या प्रत्येक महिलेला संधी मिळेल, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

विधानसभेत भाजपा महिला सदस्यांचं संख्याबळ इतर पक्षाच्या महिला सदस्यांपेक्षा जास्तच आहेत. भाजपामधील महिला आमदारांमध्ये तसं कॅलिबर आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा महिला आयोगाच्या नोटिशीला चित्रा वाघ यांच्याकडून उत्तर; माझी हरकत…

पहिल्यांदाच बालकल्याण मंत्रालय पुरुषाकडे

एखाद्या महिलेला मंत्रिपद दिलं की तिच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रालय सोपवलं जातं. मात्र, भाजपाने पहिल्यांदाच महिला आणि बालकल्याण मंत्रालय एका पुरुषाकडे सोपवलं आहे. यामुळे पुरुषांनाही महिलांच्या समस्या कळतील, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

आयोगावर आक्षेप नाही

आमचा आक्षेप आयोगावरच नाही. चाकणकर यांच्याआधीही तिथे अनेकजण येऊन गेले आहेत. त्यामुळे आक्षेप आयोगावर नसून त्या आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेल्या व्यक्तीवर आहे. राहिला प्रश्न नोटिशीचा तर, मला रोज ५६ नोटिशी येत असतात. त्यामुळे आयोगाचा सन्मान राखावा म्हणून मी आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -