Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी कोल्हापूर दंगल : राऊत आणि आव्हाडांनी आपलं डीएनए तपासावं, चित्रा वाघ यांचा घणाघात

कोल्हापूर दंगल : राऊत आणि आव्हाडांनी आपलं डीएनए तपासावं, चित्रा वाघ यांचा घणाघात

Subscribe

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना काही अल्पवयीन तरुणांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीचे वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. त्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. मंगळवारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी, अशी मागणी केली. तर काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली. जवळपास तीन तास सुरू असलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पोलिसांनी लाठीचार्ज केला. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कोल्हापुरातील इंटरनेट सेवा ३१ तास बंद राहणार आहे. दरम्यान, या प्रकारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपलं डीएनए तपासावं, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात औरंगजेबच्या औलादी अचानक वाढू लागल्या आहेत. ज्यांनी त्यांना जन्म दिला, त्या महाविकास आघाडीचा आणि औरंगजेबचा डीएनए एकच असेल. काही तरुणांनी औरंगजेबचे स्टेट्स ठेवल्यामुळे याठिकाणी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांद्वारे दंगल भडकावण्याचं काम सुरू आहे. हे कोणाच्या मदतीने सुरूये. हे जनतेला माहिती आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

राऊत आणि आव्हाडांनी आपलं डीएनए तपासावं. मला पूर्णपणे विश्वास आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबच्या कथित वंशजांना मुळासकट उखडून टाकतील, असंही वाघ म्हणाल्या.

ऑन एअर धमक्या आजपर्यंत कोणी दिल्या नव्हत्या – संजय राऊत

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापूर प्रकरणी बोलताना ‘अचानक औरंगजेबाच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल’, असा इशारा दिला होता. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अशाप्रकराच्या ऑन एअर धमक्या आजपर्यंत कोणी दिल्या नव्हत्या. फडणवीस म्हणतात औरंग्यांना सोडणार नाही, पण ते औरंगे तुम्ही तुमच्या अवती भोवती पोसताय. मोगलाई दुसरी काय होती? हीच मोगलाई होती. मोगलाई फक्त खान, सलीम, अब्दुल, अकबर नाही. मोगलाई ही वृत्ती आहे, विकृती आहे. हिंमत असेल तर करा या लोकांवर कारवाई, ज्यांनी ऑन एअर धमक्या दिल्या. तरच तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी मग चौकशी आणि स्वतःच्या बाबतीत चौकशी नाही, तक्रार नाही, एफआयआर नाही, गुंडागुंडांचं खुल्ल समर्थन ही राज्याची सध्याची स्थिती आहे. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की मी या राज्याचा गृहमंत्री आहे की नाही? असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला.


हेही वाचा : राजकारणासाठी ‘औरंगजेब’ लागणे हे कथित हिंदुत्वाचं दुर्दैव; कोल्हापूर प्रकरणी राऊतांचा सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisment -