मलाही तुमच्यातला दम बघायचाय; चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान

सगळे मार्ग संपल्यानंतर चित्रा वाघविरोधात बोलायला वैयक्तिक विषयावर येता

chitra wagh reply mehboob shaikh on personal criticism
मलाही तुमच्यातला दम बघायचाय; चित्रा वाघ यांनी स्विकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान

मलाही तुमच्यातला दम बघायचाय असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच आव्हान स्वीकारलं आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या सभेत मेहबूब शेख यांनी लाचखोर नवऱ्याची बायको असा उल्लेख चित्रा वाघ यांचा केला तसेच चित्रा वाघ यांच्या नवऱ्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. चित्रा वाघ यांनी शेख यांचे आव्हान स्विकारले असून मेहबूब शेखवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. मलाही तुमच्यातला दम बघायचाय अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.

मेहबूब शेख यांनी केलेलेल्या वक्तव्याचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की,वाघावरती कोल्हे आणि कुत्रे भुंकायला लागले आहेत. मी काय आहे आणि काय नाही ते तुमच्या बापाला जाऊन विचारा. मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. कसल्या टेस्ट म्हणताय पाहिजे त्या टेस्ट करायला तयार आहोत… माझा नवरा बलत्कारी नाही आहे.. कोल्हा, कुत्र्यांना मी भीक घालत नाही.. मी वाघ आहे.. हे लक्षात ठेवायचं असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे.

आता टीका करण्यासाठी दुसरा विषय शिल्लक नाही आहे. बलात्कारी आणखी काय बोलणार, सगळे मार्ग संपल्यानंतर चित्रा वाघविरोधात बोलायला वैयक्तिक विषयावर येता, मेहबूब शेख बलात्कारी आहे. हा वैयक्तिक विषय नाही आहे. पिडिता त्या ठिकाणी आली होती. तिने स्टेटमेंट दिल्या आहेत काय झाले, कसं झाले, कुठे झाले याची माहिती दिली मात्र सत्तेचा वापर करुन बळाचा वापर करुन यांनी पोलिसांकडून बी समरी मिळवण्यासाठी बलात्काऱ्याने यश मिळवले आहे. म्हणून तो बलात्कारी नाही अशातला भाग नाही. औरंगाबादच्या खंडपीठाने त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत.

साहेबांची राष्ट्रवादी राहिली नाही

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना नेहमी सन्मान दिला आहे. आताची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रावादी राहिली नाही. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीच अमान्य करणार नाही. मात्र याच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महिला सरपंचाला मारहाण करतोय, तिला वाटेल तसं बोलतो हे अतिशय दुर्दैवी आहे. मी पिडीतांच्या मागे उभी राहते यामुळे मला बोललं जात आहे. यामुळे ही आता साहेबांची राष्ट्रवादी राहिली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.


हेही वाचा : बेळगाव झांकी है, मुंबई अभी बाकी है; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा