घरमहाराष्ट्रचित्रा वाघांचा आता सुळेंवर निशाणा; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, काय वेळ आलीय...

चित्रा वाघांचा आता सुळेंवर निशाणा; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, काय वेळ आलीय बघा!

Subscribe

Chitra Wagh taunt to MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत संविधान कट्ट्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले होते.

Chitra Wagh taunt to MP Supriya Sule | मुंबई – “बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकांपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात,” अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर असताना केली होती. त्यावर, सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ पोस्ट करत भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत संविधान कट्ट्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या आई-वडिलांना २०२४ च्या निवडणुकीत मला मतदान करायला सांगा, असं वाहान केलं. यावरूनच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

“काय वेळ आलीये? ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ सुप्रिया सुळे ताईंवर आलीये? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर,” असा टोला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर लगावला आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

- Advertisement -

मुंबई मेट्रो २ए आणि ७ च्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या दौऱ्याविषयी सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले होते. यावर, “महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. या भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा,सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहेत. मात्र आज यांसारखे नेते भाजपाकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकांपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींशिवाय भाजपाकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -