घरमहाराष्ट्रChitra Wagh : विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळेंना सहन होईना, चित्रा वाघ...

Chitra Wagh : विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळेंना सहन होईना, चित्रा वाघ यांची टीका

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई प्रतिष्ठेची झाली आहे. या मतदारसंघात पवार कुटुंबातील नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (एनसीपी – एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांचा संताप, म्हणाले – भाजपाच्या आता दोन जागाही…

- Advertisement -

साधारणपणे नऊ महिन्यांपूर्वी पवार कुटुंबात फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एनसीपी आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला होता. आता बारामतीमध्ये विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाची सरशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

याच फोडाफोडीच्या राजकारणावरून सुप्रिया सुळे यांनी गेले काही दिवस सातत्याने भाजपावर निशाणा साधला आहे. अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली आहे. सध्याचे राजकारण हे लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने सुरू आहे. मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे पाप अदृश्य शक्ती करत आहे. ही शक्ती महाराष्ट्राच्या मागे का लागली आहे, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Supriya Sule : आमदार रोहित पवारांसह युगेंद्र पवारांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचे पुणे पोलिसांना पत्र

याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ‘इतना डर किस लिए मोठ्ठ्या ताई…’ असे ट्वीट करत सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. मतदारसंघात आपल्या विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळे यांना सहन होईनासा झाला आहे, असे त्यांच्याकडे पाहून वाटत आहे. जी तुतारी प्राणपणाने फुंकण्याचा निश्चय केला, तिचे सूर विरोधी उमेदवाराच्या रणगर्जनेपुढे फिके पडताना दिसत आहेत, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

पुढ्यात वाढून ठेवलेला पराभव पचवण्यासाठी मनाची तयारी केली म्हणूनच उगाच कुठल्या तरी ‘अदृष्य शक्ती’कडे सुप्रिया सुळे बोट दाखवत आहेत. खरं म्हणजे, सुप्रिया सुळे ज्या अदृश्य शक्तीला घाबरत आहात, ती शक्ती म्हणजे जनशक्ती! आतापर्यंत अदृश्य ठेवलेली आपली ताकद जनता मतपेटीतून दाखवणार आहे. सुप्रिया सुळे यांचे सिंहासन डळमळीत करणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – BMC FD : पालिकेच्या ठेवींवर शिंदे सरकारकडून दरोडा; MMRDA ला 1000 कोटी देण्यावरुन आदित्य ठाकरे भडकले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -