घरमहाराष्ट्रThe Kerala Story: चित्रा वाघांचा दीदींना टोला; म्हणाल्या, 'द बंगाल स्टोरी'चे भय

The Kerala Story: चित्रा वाघांचा दीदींना टोला; म्हणाल्या, ‘द बंगाल स्टोरी’चे भय

Subscribe

 

मुंबईः The Kerala Story चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यावरुन भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्वीट करुन निशाणा साधला आहे. दीदींना ‘द बंगाल स्टोरी’ बाहेर येईल अशी भीती वाटते. त्यामुळेच त्यांनी The Kerala Story चित्रपटावर बंदी आणली आहे, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

The Kerala Story चित्रपटावर बंदी आणल्याने सत्य लपणार नाही. याला हुकुमशाही म्हणतात. तुमची धर्मांतराची वृत्ती यातून समोर येते. नागरिकांनी काय बघावे आणि काय बघू नये हे तुम्ही नका ठरवू. मात्र मला माहीत आहे की तुम्हाला कसले भय आहे. केरळामध्ये जे घडलं आहे ते बंगालमध्येही होत आहे. त्यामुळेच तुम्हाला भीती वाटते की, द बंगाल स्टोरी तयार होईल आणि तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

The Kerala Story चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सर्वोच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने ही याचिकाच फेटाळून लावली. लोकांना ठरवू द्या की काय बघावं व काय बघू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्रात भाजपचे आमदार या चित्रपटाचे मोफत शो आयोजित करत आहेत. तर सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी आणली. त्यावर चित्रा वाघ यांनी ट्वीट करुन टीका केली.

राज्य शासन ऐकत नसेल तर कायदेशीर लढाई लढावी लागेल, असे ट्वीट चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -