Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांनी जाब विचारुन उत्तर द्यावे, महिला सरपंच मारहाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांची...

मुख्यमंत्र्यांनी जाब विचारुन उत्तर द्यावे, महिला सरपंच मारहाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

आमच्या लोकांना रांगेत उभं न राहता लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

Related Story

- Advertisement -

कदमावक वस्तीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणात उत्तर देण्याची मागणी केली आहे. एका महिलेला मारहाण होताना सत्ताधारी पक्षातील एकही जण याची दखल घेत नाही. तसेच प्रशासकीय सेवेतील एकाही अधिकाऱ्याने या महिला सरपंचांना फोन करुन घटनेची माहिती घेतली नाही. हे सरकार पक्षातील आमदारांना वाचवण्यासाठी काम करत आहे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी गायकवाड यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे की, गावच्या सरपंचावर हल्ला झाल्यानंतर बिडीओंची भूमिका काय, प्रांत अधिकारी, कलेक्टर, जिल्हा परिषद सीईओंची भूमिका काय ? अजूनही कोणी दखल घेतली नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील खात्यातील सरपंचाची दखल घेतली नाही. याचा कोणीही कॉगनिझन्स घेतला नाही. तुम्ही कोणाच्या शपथा घेऊन काम करत आहात. गौरी गायकवाडला प्रशासकीय यंत्रणेत असूनही कोणाची मदत मिळाली नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांना वाचवण्यासठी कायदे बनवले आहेत का? या प्रकरणातही तेच ज्योती देवरेच्या केसमध्ये तेच, औरंगाबादच्या केसमध्येही तेच आहे. याचा अर्थ आमच्या पक्षातील लोकांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा कशी राबत आहे हे आपल्याला दिसत आहे. कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पुढे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेमध्ये इतके धिंडवडे कुठेही बघितले नव्हते. आज दिवसा ढवळ्या बायकांवर हल्ले होत आहेत. एका बाईची बोटं तोडून टाकली, दुसऱ्या बाईला अॅट्रोसिटीच्या नावाखाली धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही विचारू का महाराष्ट्र माझा? याची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील ते आपल्या राज्याचे प्रमुख आहेत कुटुंब प्रमुख आहेत यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाब विचारुन याचं उत्तर द्यावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

गौरी गायकवाड काय म्हणाल्या ?

कदमावक वस्तीमध्ये लवकरात लवकर लसीकरण व्हावं यासाठी ग्रामपंचायतीमधून पत्र लिहिले होते. नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी लसीकरणासाठी पत्र लिहिले, लसीकरण व्यवस्थित सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी दबाव आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या लोकांना रांगेत उभं न राहता लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. अनेक लोकं सकाळी ६ वाजेपासून रांगेत उभे असतात यामुळे मी स्वतः उपस्थित राहून सुरळीत लसीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बघून घेऊ असे म्हटलं होते. एका राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून मारहाण झाली असली तरी मी पुन्हा बाहेर पडणार आणि गावासाठी लढणार असल्याचे सरपंच गौरी गायकवाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

लसीकरण सुरळीत सुरु होतं. त्या ठिकाणी सुजीत नावाचा व्यक्ती आला होता त्यांना लस घ्यायचे आहे का? असे विचारला असता त्यांनी माझे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा त्यांच्यासह उपस्थित होता. त्यांच्याजवळ जाऊन त्यांना कशासाठी उभं असल्याचे विचारणा केला असता त्यांनी मला मारहाण केली आणि शिवीगाळ करण्यात आली. अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरण्यात आली असल्याचे सरपंच गौरी गायकवाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -