घरताज्या घडामोडीचर्चगेट रेल्वे स्थानकाला डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे नाव; शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव

चर्चगेट रेल्वे स्थानकाला डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे नाव; शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव

Subscribe

दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण चर्चगेट रेल्वे स्थानकाला डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याबाबत शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. (Churchgate Railway Station Name of Dr Chintamanrao Deshmukh Resolution in Shiv Sena Executive Committee)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, अनेक ठराव मांडण्यात आले.

- Advertisement -

शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पश्चिम रेल्वे स्थानकातील चर्चगेट स्थानकाला डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याच ठराव मांडण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड

- Advertisement -

या कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवलं आहे. पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. या बैठकीत मराठीला अभिजात दर्जा देण्याचा ठराव झालाय. तसेच 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव झाला.

शिस्तबद्ध समिती स्थापन

“शिवसेनेची आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तबद्ध समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांना सदस्य म्हणून तीन जणांची समिती आहे. पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई, पक्षाच्या विरोधात काही लोकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीची आखणी करण्यात आली”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


हेही वाचा – ठरलं! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -