मस्साजोग येथील आवादा या पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी 2 मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड पोलिस कोठडीत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातही वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे. पण, आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिक कराडनं अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्डिंग आता ‘सीआयडी’च्या हाती लागले आहे. आवाजाची तपासणी सुरू झाली आहे.
सुनील केदू शिंदे ( 42, रा. नाशिक मु. बीड ) हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे.’
हेही वाचा : ‘ठाकरे गट झोपलेला,’ अमोल कोल्हेंच्या विधानावरून राऊतांनी सुनावलं; म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की…”
कुणी कसा आणि कधी केला फोन?
29 नोव्हेंबरला शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मिकअण्णा बोलणार आहेत, चाटेनं सांगितलं. ‘ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलं आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा,’ असं म्हणून काम बंद करण्याची धमकी वाल्मिक कराडनं दिली. त्याच दिवशी घुले आवादाच्या कार्यालयात आला.
‘काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडू. काम चालू ठेवायचे असेल, तर दोन कोटी रुपये द्या,’ असा दमही वाल्मिक कराडने शिंदेंना दिला होता. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदेंच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग ‘सीआयडी’च्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का? यासाठी व्हाइस स्पॅम्पल घेतले जात आहेत.
कराडचे डोळे लाल….
वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत आहे. पण, कराड हा तणावात असून त्याला व्यवस्थित झोपही येत नाही. त्यामुळे त्याचे डोळे लाल झाले आहेत. डॉक्टरांनी बुधवारी त्याची तपासणी केली आहे. त्यानंतर नेत्ररोगतज्ञांनी तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यात आले. जास्तीच जागरण आणि तणावामुळे डोळे लाल होतात, असं तज्ञांनी सांगितलं.
हेही वाचा : वाद पेटला! वडेट्टीवारांची ‘ती’ शंका अन् काँग्रेसनं जागावाटपात कसा घोळ घातला राऊतांनी थेटच सांगितलं