परमबीर सिंग यांच्यावरील आरोपाची सीआयडी चौकशी होणार, तक्रारदार घाडगेंना समन्स जारी

ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा घाडगे यांनी आपल्या तक्रार अर्जात मांडला होता.

2 cops named as co-accused with Param Bir Singh in FIR in extortion case arrested by Maharashtra CID

गृहरक्षक दल विभागाचे राज्याचे प्रमुख परमबीर सिंग यांच्यावर एका पोलीस निरीक्षकाने केलेला भष्ट्राचाराच्या आरोपाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडून तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे हे अकोला येथील मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी कार्यरत आहे. घाडगे यांनी २० एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला होता.

भीमराव घाडगे यांनी अर्जात गृहरक्षक विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा घाडगे यांनी आपल्या तक्रार अर्जात मांडला होता. या गृहविभागाने घाडगे यांच्या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी १९ मे रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोकण भवन नवीमुंबई येथे हजर राहावे असे या समन्स मध्ये नमूद करण्यात आले आहे.

परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. त्याच्याकडे तपासासाठी असलेल्या गुन्हे क समरी करण्यात यावे म्हणून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी घाडगे यांच्यावर दबाव आणला होता, तसेच घाडगे यांना खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले होते असा आरोप घाडगे यांनी केला अर्जात केला आहे. तसेच २०१४ ते २०१८ या कालावधीत परमबीर सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्त असताना केलेल्या कथित भ्रष्टाचार, तसेच बेहिशेबी मालमत्ता संदर्भात घाडगे यांनी आपल्या तक्रार अर्जात आरोप केले आहे.