घरमहाराष्ट्रजालना-खरपुडी नवीन शहर प्रकल्पांसाठी सिडकोची निवड

जालना-खरपुडी नवीन शहर प्रकल्पांसाठी सिडकोची निवड

Subscribe

नवी मुंबई | औरंगाबाद (वळूंज), नवीन नाशिक, नांदेड, ओरोस, वसई-विरार उपप्रदेश आणि महामुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबई, रायगड या शहरांचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिडको प्राधिकरणाकडे (CIDCO Authority) आता नवी जबाबदारी देण्यात आली आहे. सिडकोच्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील दीर्घ व उत्कृष्ट कामगिरीमुळे जालना-खरपुडी (Jalna- Kharpudi) नवीन शहर प्रकल्पासाठी सिडकोची “नवीन शहर विकास प्राधिकरण” (New Town Development Authority) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सिडकोतर्फे राज्यामध्ये विकसित केलेल्या नवीन शहर प्रकल्पांपैकी जालना-खरपुडी हे अकरावे शहर असणार आहे.

राज्य शासनातर्फे २०१९ मध्ये जालना-खरपुडी हे अधिसूचित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर शासनाकडून सदर क्षेत्र हे निरधिसूचित (डीनोटीफाइड) करण्यात आले. तद्नंतर सिडकोतर्फे जालना-खरपुडी क्षेत्र विकसित करण्यासाठी आपली विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार, संचालक, नगर नियोजन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर, शासनातर्फे सदर क्षेत्र हे “नवीन शहर” आणि सिडकोला “जालना-खरपुडी नवीन शहर विकास प्राधिकरण” म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

सिडकोची नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाल्याच्या तारखेपासून सदर अधिसूचित क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असलेल्या अन्य कोणत्याही विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्य संपुष्टात येणार आले आहे. सिडको सदर अधिसूचित क्षेत्रासाठी नियोजन प्रस्ताव तयार करून प्रकाशित करेल व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मध्ये नमूद प्रक्रियेचे पालन करून प्रस्ताव शासनाला सादर करणार आहे. सदर अधिसूचित क्षेत्राकरिता एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू होणार आहे. या प्रकल्पाचा आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी सिडकोतर्फे काम सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -