Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeताज्या घडामोडीCidco lottery : सिडकोची व्हॅलेन्टाईन गिफ्ट, पसंतीच्या घरांची शनिवारी सोडत

Cidco lottery : सिडकोची व्हॅलेन्टाईन गिफ्ट, पसंतीच्या घरांची शनिवारी सोडत

Subscribe

सिडकोच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या महागृहनिर्माण योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे व परवडणार्‍या दरातील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी नागरिकांना या योजनेद्वारे लाभली आहे.१५ फेब्रुवारी रोजी रायगड इस्टेट, फेज १, भूखंड क्र. १, सेक्टर-२८, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड येथे सकाळी ११वाजता या सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

नवी मुंबई :
सिडको महामंडळाच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या योजनेतून घरांसाठी अर्ज छानणी पुर्ण झाली आहे. यशस्वीरित्या नोंदणीकृत अर्जदारांची अंतिम यादी संकेतस्थळावर सिडकोने यापुर्वीच अद्ययावत केली आहे. या घरांसाठी संगणकीय सोडत १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या योजनेतील घरे ही सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरातील असून नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हे सर्व गृहप्रकल्प साकारण्यात आले आहेत.त्यामुळे गृह स्वप्नपूर्ती करीता अर्ज करणार्‍यांमध्ये उत्सुकता वाढली होती.
हेही वाचा…Photo : एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी हाती घेतले शिवधनुष्य
सिडकोकडून माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेचा दसर्‍याच्या मुहुर्तावर म्हणजे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री गणेशा करण्यात आला होता. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६,००० सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा…Pratap Sarnaik : रिक्षा चालकांना 10 हजार रुपये अनुदानाची घोषणा; काय आहे योजना
अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या १५ सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
सिडकोने  २६,००० घरांच्या विक्रीची योजना जाहीर केली होती. तब्बल दीड लाख अर्ज आले, त्यापैकी २१,३९९ अर्जदारांनी बुकिंगची रक्कम भरली आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी तयार झाली आहे.
असा पाहा घर बसल्या निकाल
सिडकोच्यावतीने सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर देखील करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घर बसल्या देखील पाहू शकतात. सोडतीमधील यशस्वी उमेदवारांची यादी lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.