Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीCidco Lottery 2024 : ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील अटी शिथिल, अर्जालाही...

Cidco Lottery 2024 : ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील अटी शिथिल, अर्जालाही मुदत वाढ

Subscribe

विविध नोड्समध्ये ६७ हजार घरांची महायोजना साकारली जात आहे. या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता २६,००० सदनिका उपलब्ध करून दिल्या आहे.

नवी मुंबई :  सिडकोची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला ११ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता सिडकोने या योजनेतून अधिकाधिक नागरिकांचे घरांचे स्वप्नपुर्ण व्हावे या करीता ऑनलाइन अर्ज नोंदणीला ११ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्याच बरोबर या योजनेतील काही अटी शिथिल केल्या आहेत. पसंतीचे घर योजनेतून आपल्या घराचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.
हेही वाचा…Sharad Pawar : भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, आता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यायला हवी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही गृह योजनेचा शुभारंभ केला होता. १२ ऑक्टोबरपासून घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून महिनाभरात ९२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.
परवडणाऱ्या दरासह परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी या गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेसही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आजपर्यंत ९२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेद्वारे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी सुसज्ज शहरामध्ये घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना लाभली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी आपले घराचे स्वप्न साकार करण्यासाठी योजनेकरिता अर्ज करावा, असे आवाहन  सिडकोने केले आहे.
हेही वाचा… Hair Care Tips : बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल या उपायांनी कमी करा

सिडकोने ‘या…’ अटी केल्या शिथिल

  1. अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिल्याने उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यास अधिकचा अवधी मिळाला आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे.
  2. ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे.
  3. शंभर आणि पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, वचनपत्र सादर करण्याची अटही शिथिल केली आहे. त्यामुळे अर्जदारांना कोर्‍या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र, वचनपत्र सादर करता येणार आहे.                                                                                

सोडतीची वैशिष्टये

  1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांना प्रधान मंत्री आवास योजनेचे अनुदान घेता येईल.
    सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

  2. अधिक माहिती सिडकोच्या https:ड़ड़.cidcohomes.com या संकेतस्थळावर आहे.
    अर्जदारांना संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.

                                                                                                                                                              (Edited by :Dnyaneshwar Jadhav)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -