सिडकोचा महामुंबईला गतीमान करण्यावर भर; अर्थसंकल्पात गृहप्रकल्प, नैनासाठी भरीव तरतूद

नगर विकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण म्हणून 50 वर्षांहून अधिक काळ सिडकोने यशस्वी वाटचाल केली आहे. सिडकोने विकास प्रकल्पांकडे अधिक लक्ष केंद्रीत करत यंदाच्या अर्थसंकल्पात महामुंबईला अधिक गतीमान करण्यावर भर दिला आहे.

CIDCO's emphasis on revitalizing Greater Mumbai

सिडकोने सन 2023-24 चा चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना चौकार तत्वांना स्थान दिले आहे. यात पहिले पारदर्शकता, दुसरे उत्तरदायित्व, तिसरे म्हणजे उत्तम लेखांकन आणि चौथे कामगिरी तत्व यांचा समावेश आहे. सिडकोच्या तिजोरीत वर्षाकाठी जमा होणार्‍या तिजोरीतून महामुंबई क्षेत्रासाठी 10 हजार 498 कोटी 3 लाख 3 हजार रुपये सिडको विकासकामांसाठी खर्च करणार आहे. गेल्या 2022-23 या वर्षात सिडकोचा 7.80 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 2.68 लाख कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी यंदाच्या 2023-24 या आर्थिक वर्षांचे खर्चाचे विवरण जाहिर केले आहे. या खर्चाला नुकत्याच झालेल्या संचालक मंडळात मंजुरी घेण्यात आली आहे. सिडकोने अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, खारघर ते तळोजा मेट्रो प्रकल्प, एक लाख घरांची निर्मिती, मालकीचे हेटवणे धरण, रेल्वे, नवीन शहरे, नैना प्रकल्प, सिडको प्राधिकरण क्षेत्रात पाणीपुरवठा यावर खर्चाचे नियोजन आहे. नवी मुंबईतील नगर नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोने मागील दोन वर्षांत 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या केली आहे. यामुळे सिडकोला राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांकडून उपलब्ध होणार्‍या पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला प्रकल्पाची सुरुवात होण्याअगोदरच फायनान्शियल क्लोजर सादर करणार्‍या महामंडळांपैकी सिडको एक आहे.

लेखांकन उत्तम, महसूल उच्चतम
कोविड संकटाच्या आधी व त्यानंतरच्या स्थितीत अनेकदा सिडकोच्या आर्थिक स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने उत्तम लेखांकन प्रथांची अंमलबजावणी करून चांगले यश मिळवत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उच्चतम महसूल प्राप्त केला आहे. हेच तत्त्व 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना अवलंबिण्यात आले.

अर्थसंकल्पीय अंदाज (खर्च)
सर्वसाधारण अंदाजपत्रक – 4,15,614 कोटी
सिडको महागृहनिर्माण – 3,75,151 कोटी
नवी मुंबई मेट्रो – 89,180 कोटी
सिडको पाणीपुरवठा – 57,222 कोटी
रेल्वे – 38,134 कोटी
नैना – 50,147 कोटी
नवीन शहरे – 24,352 कोटी

आर्थिक वर्ष 2023-24 सुरू होत असताना मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधानी आहे. कोविड महासाथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करत सिडको कर्मचारी व अधिकार्‍यांनी नवी मुंबईला खर्‍या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा सार्थी लागली आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोनात मृत्यू पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास 50 लाखांची मदत मंजूर; राज्यातील पहिलीच मदत