नवी मुंबई :
दसर्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने एक लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. हा प्रकल्प केवळ घरांच्या सोयींसाठीच नव्हे, तर प्रवासासाठी सुलभ कनेक्टिव्हिटी, परिपूर्ण पायाभुत सुविधांमुळे देखील महत्त्वाचा ठरला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. २६ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ सिडकोने दिली आहे.
हेही वाचा…Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारासाठी फडणवीस – पवार दिल्लीत; नाराज शिंदे मुंबईतच?
‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजने अंतर्गत २६ हजार सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे व परवडणार्या दरातील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा…Mangesh Chivate : मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना धक्का, विश्वासू सहकाऱ्याला महत्त्वाच्या पदावरून हटवले
अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता यावा व अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी याकरिता योजनेच्या अर्ज नोंदणीस २६ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.आता या योजनेची इकेवायसी नोंदणी देखील २६ डिसेंबर पर्यंत करता येईल. सिडकोतर्फे cidcohomes.com हे संकेतस्थळ सुरु केले असून नोंदणी प्रक्रिया तथा योजनेविषयी अतिरिक्त माहितीसाठी ९९३०८७०००० येथे संपर्क साधण्याचे आव्हान सिडकोने केले आहे.
-
कुठे आणि किती फुटाची घरे
-
खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर १(अ): २ बीएचके ; १८०३ सदनिका LIGB
-
खारघर बस डेपो सेक्टर १४ : १ बीएचके; १७०० सदनिका EWS
-
खारघर बस टर्मिनस सेक्टर १४ : १ बीएचके; ३४० सदनिका LIG
-
पनवेल बस टर्मिनस सेक्टर ८ : १ बीएचके; १७२ सदनिका LIG
-
कळंबोली बस डेपो सेक्टर १७ : १ बीएचके; १३६० सदनिका EWS
-
खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर २८ : १ बीएचके १४७० सदनिका LIG
-
मानसरोवर स्टेशन टर्मिनस सेक्टर ३९ : १ बीएचके ८४० सदनिका LIG
-
उलवे-बामणडोंगरी सेक्टर ६ : १ बीएचके १७०० सदनिका EWS
-
उलवे-खारकोपर सेक्टर १६ (ए) : १ बीएचके २११३ सदनिका LIG
-
उलवे-खारकोपर सेक्टर १६ : १ बीएचके २८८ सदनिका EWS
-
खारकोपर पश्चिम सेक्टर ८ : १ बीएचके २८८ सदनिका EWS
-
तळोजा सेक्टर ३९ : १ बीएचके ७५०९ सदनिका EWS
-
तळोजा सेक्टर ३७ :१ बीएचके ८१६ सदनिका LIG A: २ बीएचके ८ सदनिका LIG B
-
तळोजा सेक्टर २८ : १ बीएचके २१८५ सदनिका EWS
-
वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर १९ : १ बीएचके ३१३१ सदनिका LIG
(Edited by :Dnyaneshwar Jadhav)