घरमहाराष्ट्रनाशिकसर्कस मोजतेय अखेरची घटका; ५ वर्षच अस्तित्व

सर्कस मोजतेय अखेरची घटका; ५ वर्षच अस्तित्व

Subscribe

७० हजारांच्या दैनंदिन खर्चासाठी कसरत

नाशिक : चिमुकल्यांपासून आबालवृद्धापर्यंत सर्वांचेच आकर्षण असलेल्या सर्कशीला कोरोनापासून लागलेले ‘ग्रहण’ अद्याप सुटलेले नाही. देशभरात आता अवघ्या पाच सर्कस आपले अस्तित्व टिकवून आहेत. दुर्दैव म्हणजे, या क्षेत्रात नवे कलाकार येत नसल्याने आणि अनुभवी कलाकार बोटावर मोजण्याएवढेच शिल्लक राहिल्याने भारतातील सर्कस पाच वर्षांनंतर नामशेष होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्कस टिकवायची असेल तर तिला लोकाश्रयासह राजाश्रयाची गरज आहे.

नाशिकमध्ये दाखल झालेल्या एशियाड सर्कशीला दररोज तब्बल ७० हजार रुपयांचा खर्च करण्यासाठी सर्कशीच्या व्यवस्थापकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. सर्कशीत प्राणी नसल्याने लहानग्यांचा हिरमोड होतो. केंद्र सरकारने सर्कशीला अनुदान देण्यासह प्रयोगांसाठी सवलतीच्या दरांत जागा उपलब्ध करुन दिल्यास या क्षेत्रातील कलाकारांचे जीवनमान सुधारुन सर्कशीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा एशियाड सर्कसचे वरिष्ठ व्यवस्थापक अलंकेश्वर भास्कर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisement -

धाडसी खेळ, जोकरच्या गंमती-जमती आणि काही जादुचे प्रयोग अशा माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करणारी सर्कस डिजिटल युगामुळे केवळ पुस्तकातच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. भारतात ग्रेट जेमिनी, एशियाड, रॅम्बो, गोल्डन आणि जम्बो एवढ्या पाच सर्कस तग धरुन आहेत. कोरोनापूर्वी देशभरात १०० हून अधिक सर्कशी होत्या. कोरोनामुळे सर्कशींचे प्रयोग बंद झाले आणि उदरनिर्वाहासाठी या क्षेत्रातील कलाकार अन्य क्षेत्रात गेले. त्यातच, न्यायालयाने सर्कशींमध्ये प्राण्यांचा वापर करण्यास मनाई केल्याने सर्कशीमधील महत्त्वाचे आकर्षणही गेले. सर्कशीला राज्य व केंद्र शासनाचे अनुदान नाही. दळणवळण, जागा व वीज खर्च भागविताना सर्कसचालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कला जिवंत ठेवण्यासाठी सर्कशींचे प्रयोग केले जात आहेत. एशियाड सर्कशीत सर्वाधिक कलाकार आहेत. हे कलाकार दररोज ४ ते ५ तास सराव करतात. कलाकारांशिवाय इतर २०० कामगार वेगवेगळे काम करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -