घरCORONA UPDATECoronaVirus सर्वेक्षणासठी आलेल्या आरोग्य सेविकांना नागरिकांनी केली दमदाटी

CoronaVirus सर्वेक्षणासठी आलेल्या आरोग्य सेविकांना नागरिकांनी केली दमदाटी

Subscribe

अहमदनगरच्या मुकूंदनगरमध्ये दोन परदेशी नागरिक करोनाबाधित आढळले, त्यामुळे प्रशासनाने हा सर्व परिसर बॅरिकेटसच्या साहाय्याने नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान या भागात कोरोनासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या आरोग्य सेविकांना सोमवारी काही नागरिक दमदाटी करत अंगावर धावून आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरमध्ये रविवारी दोन परदेशी नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आल्यानंतर त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र हे दोन परदेशी नागरिक नगरच्या मुकूंदनगरमध्ये मुक्कामी थांबले होते. या परदेशी नागरिकांत एक फ्रान्सचा तर दुसरा आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टचा आहे. त्यामुळे या परिसरात सोमवारी आरोग्य सेविकांमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु होेते. यात कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का? तुमच्या घरी परदेशातून काेणी आले का? अश्या पध्दतीची माहिती या सेविकांकडून संकलित केली जात आहे. ही माहिती घेतली जात या आरोग्य सेविकांनाच धमकाविण्याचा प्रकार घडला. पुन्हा या भागात न येण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस संरक्षणात आरोग्य सेविकांमार्फत ही माहिती संकलित करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान नव्याने सापडलेल्या कोरोना बाधितांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुकूंदनगर परिसर रविवारी रात्रीपासून सील करण्यात आला. मुख्य रस्ते, बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले होते. मेडीकल व रुग्णालये वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. बाहेर फिरण्यास या भागातील लोकांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -