घरताज्या घडामोडीवादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील नागरिकांना करावा लागतोय महागाईचा सामना!

वादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील नागरिकांना करावा लागतोय महागाईचा सामना!

Subscribe

 निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला असून अनेक गावे अंधारात आहेत. रात्रीसाठी नागरिकांकडून मेणबत्ती खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच आपल्या घराच्या डागडुजी साठी कौलं, कोन, सिमेंट आणि पत्रे खरेदी मोठ्या प्रमाणात भर दिली जात आहे. मात्र यांच्या फायदा घेऊन व्यापाऱ्यांकडून दुप्पट आणि तिपटीने किंमतीने या वस्तू विक्री करून नागरिकांची लूट सुरू झालेली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर महागाईने कोकणवासी त्रस्त झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून घराचे छप्पर उडणे, पिढ्यांपिढ्या जपलेली झाडं उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब उन्मळून पडणे,  अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कोकणात वित्तीय हानी झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी एक ते दीड महिना जाऊ शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोबाईल नेटवर्क बँक आणि एटीएम सेवा देखील बंद आहे. नागरिकांच्या अडचणींचा चुकीचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट सुरू झालेली आहे. २० रुपयात मिळणारे कौल आणि कोने ८० रुपये, सिमेंटची एक गोणी ३५०- ४०० रुपया ऐवजी ८०० ते १२०० रुपयांना विकली जात आहे. मेणबत्तीच्या एक बॉक्स ४० वरून १२० रुपये अशी कृत्रिम भाववाढ करण्यात आली आहे. गरजेनुसार मागणी जास्त असणाऱ्या वस्तू अडीच ते तीन पट किमतीत विकल्या जात आहे. यात प्रामुख्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांचा समावेश जिल्हा ग्राहक मंचाचे याकडे लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र त्यांचे सुद्धा यावर दुर्लक्ष सुरू आहे. अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महागरशी बोलताना अक्षय महापदी यांनी दिली आहे.

- Advertisement -

वीज नसल्याने सौर उर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे,  पत्रे, कौल,  सिमेंट, पत्रे लावण्यासाठी हुक, पंखे आणि यासारख्या इतर वस्तू मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरातून योग्य दरात खरेदी करून खाजगी वाहने पाठवायच्या झाल्यास वाहतूक खर्च कितीतरी पटीने वाढतो. ल़ॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या कोकणातील नागरिकांचा हा असा छळ सुरू आहे. हे असेच सुरू राहिल्यास कोकणातून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या बातम्या येतील किंवा आणखी लोक स्थलांतरित होतील

 रेल्वे आणि एसटी सुरु करा

रेल्वेने जवळच्या मुख्य स्थानक व तेथून पुढे एसटीने गरज असलेल्या गावात या वस्तूची वाहतूक करणे सहज शक्य आहे. अलिंबाग, मुरुडसाठी पेण आणि रोहा,  श्रीवर्धन,  हरिहरेश्वर व दापोलीसाठी माणगाव,  म्हाडासाठी वीर किंवा करंजाडी,  खेड व मंडणगडसाठी खेळ,  गुहागरसाठी चिपळूण रेल्वे स्थानकात वस्तू उतरवून राज्य परिवहन महामंडळाच्या पार्सल गाड्यांमधून पुढे नेता येऊ शकतात. जास्त वस्तू असल्यास एसटीने देखील पार्सल पाठवले जाणे शक्य आहे. त्यामुळे या वस्तूची कमतरता भासणार नाहीत.

कृत्रिम भाववाढ अशीच सुरू राहिल्यास कोकणातून देखील शेतकरी आत्महत्येच्या बातम्या यायला लागलीये. हे थांबवण्यासाठी शासनाने सध्या अत्यावश्यक असलेल्या वस्तूंची दुकाने ताब्यात घेऊन दर स्थिर ठेवावेत तसेच मुंबई,  पुण्यासारख्या शहरांतून साहित्य वादळग्रस्त भागात पोहचवण्यासाठी पार्सल सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आधीच त्रस्त असलेल्या जनतेला नाडण्याचे प्रकार होणार नाहीत.

अक्षय महापदी, सामाजिक कार्यकर्ते

निसर्ग चक्रीवादळाने आमचा घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन मदत करेल तेव्हा करेल,  मात्र आम्ही आमच्या घराची डागडूज करतो म्हटलं तर अनेक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सध्या मेणबत्ती बॉक्स खरेदी करतो आहे. मात्र मेणबत्तीच्या बॉक्सचे किंमतीही गगनाला भिडल्या आहे. शासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

केतन तवसाळकर, श्रीवर्धन

- Advertisement -

हे ही वाचा – Samsung चा सर्वात स्वस्त फोन आला, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत!


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -