घरCORONA UPDATEकोरोना व्हायरस : शहरांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जास्त सजग व संवेदनशील

कोरोना व्हायरस : शहरांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जास्त सजग व संवेदनशील

Subscribe

स्वतः सोशल डिस्टनसिंग ठेवतातच शिवाय घरात विलग (होम क्वारंटाईन) करण्यात आलेल्यांच्या हालचालीवर शेजारचे ग्रामस्थ बारीक लक्ष ठेवत आहेत.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जास्त सजग व संवेदनशील असल्याची प्रचिती सध्या अधिकाऱ्यांना येत आहे. स्वतः सोशल डिस्टनसिंग ठेवतातच शिवाय घरात विलग (होम क्वारंटाईन) करण्यात आलेल्यांच्या हालचालीवर शेजारचे ग्रामस्थ बारीक लक्ष ठेवत आहेत. काही चुकीची गोष्ट वाढल्यास ग्रामसेवक अथवा अधिकाऱ्यांना माहिती दिली जात असल्याने अधिकाऱ्यांच्या कामास मदत होत आहे. कोरोनाने सर्व जगाला विळखा घातला आहे. प्रशासन अगदी हात जोडून सर्वाना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही शहरी भागातील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये नोकरी निमित्त गेलेले अनेक जण कुटुंबासह तालुक्यात परतले आहेत. प्रशासनाने वेळीच दाखल घेत जवळजवळ सर्वानाच घरात विलग केले आहे. त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. यातील कुणालाही अद्याप कोरोनाचे लागण नसली तरी केवळ शहरातून आले असल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वसंत जमदाडे यांनी दिली.

गाव छोटे असल्याने सर्वानाच होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची माहिती होते. पर्यायाने ती व्यक्ती घराबाहेर निघाल्यास ग्रामस्थ त्वरित ग्रामसेवक किंवा इतर अधिकाऱ्यांना माहिती देतात. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही आशा लोकांवर वेगळी निगराणी ठेवण्याचा तरा कमी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रत्येक गावात यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. सरपंच समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक व सदस्य समितीचे सदस्य आहेत. समितीमार्फत गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून सरपंचाच्या परवानगीशिवाय कोणासही गावात प्रवेश दिला जात नाही. गावात निर्जंतुकीकर्णाची कामे झपाट्याने सुरू असून जनजागरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती गट विकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.

- Advertisement -

सर्वाधिक होम क्वारंटाईन ग्रामीण भागात

विदेशातून तसेच मोठ्या शहरांमधून परतलेल्या तालुक्यातील सुमारे दोन हजार हुन अधिकाना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील बहुसंख्य हे ग्रामीण भागातील आहेत. काळजी करण्याची आवश्यकता नसून त्यांना केवळ खबरदारी म्हणून विलग करण्यात आले आहे. मातीशी जवळीक असलेले ग्रामीण भागातील लोक अति संवेदनशील असून शेतीच्या कामांमुळे अनेक जण शेतातच असतात. त्यामुळे शहरातील रिकामटेकड्यांवर करावी लागत असलेली ‘प्रसाद वाटपाची’ कारवाई ग्रामीण भगत करावी लागत नाही. हे चांगले चित्र असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. महात्मा गांधींचा संदेश होता खेड्याकडे चला । त्याची प्रचिती आताशी येतेय जनतेला । सरकारने अनेक वेळा अनेक योजनांतून पटवून दिले तरीसुद्धा आम्ही शहराकडे पळालो आता आम्हाला काळ्या आईची आठवण झाली.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -