घरमहाराष्ट्रनाशिकChhagan Bhujbal : विकासात्मक कामांसाठी शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा - छगन...

Chhagan Bhujbal : विकासात्मक कामांसाठी शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – छगन भुजबळ

Subscribe

नाशिक : विकासाच्या दृष्टीने अनेक शासकीय योजना शासनामार्फत नागरिकांसाठी राबविल्या जातात. या योजनांची माहिती करून त्याचा नगारिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करीत दर्जात्मक विकासकामांसह ती जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपिस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज (ता.2 फेब्रुवारी) निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव वनस, सारोळे खु. येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रांतअधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी महेश पाटील,लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, हरिश्चंद्र भवर, शिवाजी सुपनर,ज्ञानेश्वर शेवाळे,सरपंच दत्तुपंत डुकरे, सरपंच प्रमिला चौधरी,ऍड.अनुप वनसे, राहुल डुंबरे,उन्मेष डुंबरे,महिला अध्यक्षा सुरेखा नागरे,माधवराव भोसले, मंगेश गवळी, राहुल डुंबरे, बबन शिंदे, मधुकर शिंदे, मोहन जावळे, माधव जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा… Narendra Modi : महिन्याभरात मोदी पुन्हा महाराष्ट्रात; कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन

ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, शासनाच्या अनेक योजना गावातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी शासनाच्या योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविला पाहिजे. यासाठी नागरिकांचा सहभाग व पाठपुरावा तितकाच महत्वाचा आहे. तरुणांचा शेतकरी महिला यासह समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात येत आहे. निधीच्या उपलब्धेतुसार प्राधान्यक्रमानुसार विकासकामे केली जाणार आहेत. यात ब्राम्हणगाव वनस व वनसगाव येथील शाळांची दुरुस्ती तसेच बुद्धविहाराचे कामही लवकरच करण्यात येईल.

- Advertisement -

त्याचप्रमाणे दळणवळणाच्या दृष्टीने मोठा पूल होणे गरजेचे होते. पुलाचे कामही वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. लासलगाव व येवलातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजनातून प्रत्येक गावात आवश्यक ती विकास कामे करण्यात आली आहे. या विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम जून पर्यंत पूर्ण होऊन येणाऱ्या पावसाळ्यात गावांमध्ये पाणी पोहचेल. अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेली मदत तातडीने खात्यावर वर्ग करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

या विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

1) ब्राम्‍हणगांव वनस ते वनसगांव प्रजिमा १७५ किमी १२/४०० येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ता. निफाड कामाचे भुमीपुजन (र.रु.३८२.९८ लक्ष)
2) मुलभूत सुविधा अंतर्गत स्‍मशानभुमी शेडचे बांधकाम करणे कामाचे भुमीपुजन (र.रु. १५ लक्ष)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -