घरठाणेबदलापूरमध्ये नागरिकांची दिशाभूल, ATM कार्डची अदला बदली करुन ६७ हजारांचा गंडा

बदलापूरमध्ये नागरिकांची दिशाभूल, ATM कार्डची अदला बदली करुन ६७ हजारांचा गंडा

Subscribe

बदलापूरमध्ये नागरिकांची दिशाभूल करून ATM कार्ड अदला बदली करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. मांजर्ली परिसरातील एका बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेत एरंजाड येथे राहणारे वसंत मेहेर यांची तब्बल ६७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

बदलापूरच्या एरंजाड परिसरात राहणारे वसंत मेहेर त्यांच्या मुलासोबत गुरुवारी कामानिमित्त मांजर्ली परिसरात आले होते. यावेळी त्यांनी मुलगा पूर्वेशला ATM सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी पाठवले. त्यानंतर पुर्वेशने ATM मधून ५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे आले नाही. त्याचवेळी ATMच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन तरुणांपैकी एक जण आतमध्ये आला. या तरुणाच्या सांगण्यावरून पूर्वेशने ATMमधून एकदा तीन हजार आणि दुसऱ्यांदा दोन हजार असे पाच हजार रुपये काढले. त्यानंतर अकाउंटवरील उर्वरित रक्कम तपासण्यासाठी वसंत मेहेर यांनी स्टेटमेंट काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र स्टेटमेंट मिळाले नाही. त्यानंतर पुन्हा त्याच तरुणाने वसंत मेहेर यांच्या कडून ATM घेऊन, मी तुम्हाला स्लिप काढून देतो असे सांगितले. हीच संधी साधून या भामट्याने मेहेर यांच्या ATM कार्डची अदलाबदली केली आणि तिथून निघून गेला. त्यानंतर या भामट्याने मेहेर यांच्या अकाऊंटवरून तब्बल ६७ हजार रुपये काढले. आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यानंतर मेहेर यांनी अज्ञाताच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा : ‘रात गई, बात गई’ असं म्हटलं तरच एकत्र येता येईल, चंद्रकात पाटलांचे ठाकरेंना संकेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -