घरमहाराष्ट्रनाशिकतुकाराम मुंढे येण्याच्या धास्तीने 'सिव्हिल' प्रशासन सतर्क; अभूतपूर्व स्वच्छता, ड्रेसकोड, गळ्यात आयकार्ड

तुकाराम मुंढे येण्याच्या धास्तीने ‘सिव्हिल’ प्रशासन सतर्क; अभूतपूर्व स्वच्छता, ड्रेसकोड, गळ्यात आयकार्ड

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाची स्टाईल सपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यात त्यांनी नाशिकचे महापालिका आयुक्त पदही भूषवले आहे. त्यावेळी त्यांची वादळी कारकीर्द नाशिककरांनी जवळून अनुभवली आहे. नियमांच्या तसेच आपल्या कामकाजाबाबत अत्यंत काटेकोर आसलेले मुंढे आरोग्य विभागाचे आयुक्त झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौर्‍यावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रचंड धास्ती खाल्ल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अगदी प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर ते चतुर्थश्रेणी कर्मचारी सगळेच सतर्क झाल्याची गमतीशीर स्थिती जिल्हा रुग्णालयात बघायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतेत इतका बदल झाला आहे की हे जिल्हा रुग्णालय आहे की खाजगी रुग्णालय असा प्रश्न एखाद्या नव्याने येणार्‍या व्यक्तिला पडू शकतो.  दरम्यान, १८ ते २० नोव्हेंबर याकाळात कधीही आरोग्य आयुक्त मुंढे कधीही अचानक येण्याची शक्यता आहे.

काय झालाय बदल ? 
  • प्रथमच रुग्णालयाचे सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र बघायला मिळत आहेत.
  • सर्व अधिकारी व कर्मचारी आपआपल्या ड्रेसकोड युनिफॉर्मवर बघायला मिळाले
  • सर्वच अधिकारी व कर्मचारी वेळेआधी कामावर दाखल होऊन आपली जबाबदारी काटेकोर पाळत आहेत
  • रुग्णालयाची स्वच्छता जोरात सुरू झाली आहे
  • एरवी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे स्वच्छता निरीक्षकांनी प्रथमच रुग्णालयात पाहणी केली
  • पाण्याच्या प्रेशरने खिडक्यांमधील घाण साफ करण्यात आली.
  • वार्डच्या खिडक्याच्या सज्जावर रुग्णांनी फेकलेले कपडे, अन्न, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या स्वच्छ करण्यात आल्या.
  • वार्डाच्या भिंतीचीही प्रथमच साफसफाई करण्यात आली.
  • भिंतीवर लावलेले पोस्टर काढण्यात आले.
  • रुग्णांचे बेडसीट बदलण्यात आले, स्वच्छ धुतलेले बेडशिट टाकण्यात आले
  • स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली.
  • पंख्यांना व भिंतींना लागलेले जाळे, अडगळीत पडलेले साहित्य काढण्यात आले.
  • सर्व वार्डमध्ये जंतुनाशक फवारण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -