घरमहाराष्ट्रSanjay Raut : पाच राज्यांमधील विजयाचा दावा हा मोठा विनोद, संजय राऊतांचा...

Sanjay Raut : पाच राज्यांमधील विजयाचा दावा हा मोठा विनोद, संजय राऊतांचा भाजपाला टोला

Subscribe

चार राज्यातील मतमोजणी प्रक्रियेवर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जी काही आकडेवारी समोर येत आहे. तो एक कल आहे. याबाबतचे साधारण चित्र हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणुका या उत्साहात पार पडल्या आहेत. त्यांतील मिझोराम वगळता तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज मतमोजणी पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून चारही राज्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सध्य परिस्थितीला तेलंगणा राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. तर अन्य तीन राज्यात भाजपा मुसंडी मारताना दिसून येत आहे. परंतु, या मतमोजणी प्रक्रियेवर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जी काही आकडेवारी समोर येत आहे. तो एक कल आहे. याबाबतचे साधारण चित्र हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे भाजपाकडून जो काही पाच राज्यात विजयी होण्याचा दावा केला जात आहे, तो एक मोठा विनोद असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. (claim of victory in five states is a big joke, Sanjay Raut’s taunt to BJP)

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोगही भाजपाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून… संजय राऊतांची बोचरी टीका

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्या तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आपली जादू दाखवू शकले नाहीत. त्या राज्यात राहुल गांधी आपली जादू दाखवत आहे. त्यांनी तेलंगणातील प्रमुख नेते केसीआर यांना मागे टाकले आहे. पण 1 वाजेनंतर याबाबतचा निकाल स्पष्ट होईल. आता जी काही मतमोजणी सुरू आहे, तो काही निकाल नाही ते कल आहेत. पाच राज्यांपैकी तेलंगणात काँग्रेसचा विजय होईल. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. मिझोराममध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर येतील. त्यामुळे हे तीन राज्य सोडले तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. आता जे काही आपल्या समोर येत आहे. ते कल आहेत, ज्याला आपण ट्रेंड म्हणतो. त्यामळे अनेकदा ट्रेंड कायम राहतात तर अनेकदा राहात नाही. हे मागच्यावेळी आम्ही बिहारमध्ये पाहिले आहे. त्यामुळे या दोन राज्यांपैकी एका राज्यात तरी भाजपाचा प्रभाव होणारच, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

तर, एकतर्फी निकाल हे कधीच येत नाही. तेलंगणात एकतर्फी निकाल येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही तिथे काँग्रेस आणि बीआरएसमध्ये लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सुरुवातीचे कल असतात. 24-25-30 राऊंड हे मतमोजणीचे होत असतात. आता हे राऊंड सुरू आहेत. त्यामुळे याच्या अशा काही फेऱ्या होतील. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत थांबणे गरजेचे आहे. मध्य प्रदेशात जर का भाजप विजयी झाली तर त्याचे श्रेय जाईल शिवराज सिंह चौहान यांना आणि राजस्थानात विजयी झाले तर त्याचे श्रेय जाईल भाजपाला. त्यामुळे या दोन्ही राज्यांपैकी एकाही राज्यात भाजपा विजयी झाले तर त्याचे श्रेय हे मोदी किंवा शहा यांना जाणार नाही. तर पाचही राज्यात जर का भाजपाने विजयाचा दावा केला असेल तर तो मोठा विनोद आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -