Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्र"ते म्हणत असतील तर...", मनोज जरांगेंना भेटण्याबाबत सरकारकडून देण्यात आले स्पष्टीकरण

“ते म्हणत असतील तर…”, मनोज जरांगेंना भेटण्याबाबत सरकारकडून देण्यात आले स्पष्टीकरण

Subscribe

मनोज जरांगे पाटील यांची सरकारमधील कोणतीच व्यक्ती भेट का घेत नाही, याबाबत सरकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू मांडली आहे.

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. 40 दिवसांचा राज्य सरकारला वेळ देऊन देखील मराठा आरक्षणाबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणाच्यावेळी त्यांच्याकडून अन्न, पाणी आणि त्यासोबतच औषधोपचारांचा त्याग करण्यात आला आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील मराठा समाजही आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये राजकारण्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. परंतु, आता मला बोलता येत आहे, तोपर्यंत येऊन सरकारने चर्चा करावी, असे जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण मनोज जरांगे पाटील यांची सरकारमधील कोणतीच व्यक्ती भेट का घेत नाही, याबाबत सरकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Clarification given by the government regarding meeting Manoj Jarange)

हेही वाचा – थरथरत्या हातांनी मनोज जरांगेंनी माईक धरत देवेंद्र फडणवीसांना सुनावले

- Advertisement -

सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू मांडत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते, त्यावेळीच आमचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केला होता. मात्र त्यावेळी जरांगे पाटील यांनी आमच्या गावात कुणीही पुढारी येऊ नका, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यास कोणीच गेली नाही. आता मनोज जरांगे पाटील म्हणत असतील तर सरकार नक्कीच चर्चेला तयार आहे. आम्ही एक नाही तर 100 वेळा जाऊन त्यांची भेट घेऊ.

तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. परंतु सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे तेलंगणा सरकारकडून मराठा समाजातील नोंदीसंदर्भातील कागदपत्रे मिळण्यास अडचण येत आहे. तरी यासंदर्भात लवकरच तोडगा निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अद्यापपर्यंत 23 बैठका घेतल्या आहेत. सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ. या ज्या 23 बैठका झाल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे, असे देखील शंभुराज देसाई यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटील?

मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. यावेळी जरांगे यांची प्रकृती खालावली दिसली. तर त्यांनी थरथरत्या हाताने फडणवीसांना सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -