घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गातही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Subscribe

नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेचे दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन

मुंबईत शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शनिवारी सिंधुदुर्गातही पुन्हा या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पेट्रोल दरवाढीविरोधात शनिवारी शिवसेनेने नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर नागरिकांना 100 रुपयांत दोन लिटर पेट्रोल देण्याचे अनोखे आंदोलन केले होते. यामुळे भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेमध्ये राडा झाला. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वाद मिटला.

शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेने कुडाळमधील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलनाचे आयोजन केले होते. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. या आंदोलनात सर्वसामान्यांप्रमाणेच भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणार्‍यांना प्रत्येकी १ लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार होते. मात्र, ज्या पेट्रोल पंपावर शिवसेनेने आंदोलन आयोजित केले तो पेट्रोल पंप भाजप खासदार नारायण राणे यांचा आहे.

- Advertisement -

शिवसेना आमच्या पेट्रोल पंपावरून मोफत पेट्रोल वाटपाचे आंदोलन पुकारून आम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत भाजपने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -