घरमहाराष्ट्रपुणेबाजार समिती निवडणुकीत राडा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची ग्राम पंचायत सदस्याला...

बाजार समिती निवडणुकीत राडा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची ग्राम पंचायत सदस्याला मारहाण

Subscribe

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राडा झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका ग्राम पंचायत सदस्याच्या कानशिलात लगावली आहे.

आटपाडी (सांगली) – आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राडा झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका ग्राम पंचायत सदस्याच्या कानशिलात लगावली आहे. (BJP MLA Gopichand Padalkar beat up Gram Panchayat member)

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अतिशय चुरशीने येथे मतदान सुरु आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आटपाडी येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. दुपारी १२ पर्यंत येथे ७० टक्के मतदान झाले.

- Advertisement -

त्याआधी सकाळी ११ वाजता विरोधी गटांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांच्या कानशिलात लगावली. यामुळे काहीवेळ वातावरण तंग झाले होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

बसस्थानकासमोरच मतदान केंद्र, ट्रॅफिक जॅम
आटपाडी बसस्थानकासमोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. मतदान केंद्राबाहेर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहनांची रांग लागली आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठा अडथळा होत आहे. एसटी बसेसलाही बसस्थानकात जाण्यात अडचणीचे ठरत आहे. पोलिस अधिकारी पद्मा कद, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे हे मतदान केंद्रावर हजर आहेत. त्यासोबतच मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
राज्यात २२८ कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान आणि मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. मविआला ८८ तर भाजप+शिवसेना (शिंदे गट) युतीला ५१ ठिकाणी यश मिळाले आहे. रविवारी अनेक बाजार समित्यांसाठी मतदान सुरु आहे.
ग्रामीण भागातील राजकारणावर कोणाचे वर्चस्व आहे, याचा अंदाज या निवडणुकीतून येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआला मिळालेले यश हे भाजपसोबतच शिंदे गटाची चिंता वाढवणारे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -