Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर अकोल्यानंतर नगरमध्ये भडका; शेवगावात दगडफेक, जाळपोळ; 4 पोलीस जखमी

अकोल्यानंतर नगरमध्ये भडका; शेवगावात दगडफेक, जाळपोळ; 4 पोलीस जखमी

Subscribe

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणुक काढण्यात आली होती. या निवडणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. कारण या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याचे समजते. या दगडफेकीत संबंधीत परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणुक काढण्यात आली होती. या निवडणुकीला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. कारण या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याचे समजते. या दगडफेकीत संबंधीत परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून, या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (clashes between 2 groups in shevgaon during procession 4 police was injured)

मिळालेल्या माहितीनुसार, नगरमधील शेवगाव शहरात सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री 8 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. त्यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याचे समजते. यावेळी दुसऱ्या गटाला मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या जमावाकडून दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली.

- Advertisement -

गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. परिणामी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाले. यानंतर सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्यस्थितीत पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पोलिसांनी काही वेळात परिस्थिती आटोक्यात आणली.


हेही वाचा – ‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

- Advertisment -